LogoLogo
  • Home
  • About
  • Services
  • Portfolio
  • Gallery
  • 18of18
  • Blog
  • Contact

An Ode to Women – by Chandrakant Kulkarni

Lead Media and Publicity · September 19, 2017 · 9women9days Season 2 · 0 comments · 2396 Views
14

‘9 women 9 Days’ या उपक्रमाबद्दल सदिच्छा व्यक्त करण्यासाठी सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केलेले मनोगत – 

नवरात्रीनिमित्त ‘स्त्री शक्तीला’, ‘स्त्री कर्तुत्वाला’ गौरवीत करणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. स्त्रीमुक्ती, स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, स्त्री सबलीकरणावर ठोस भूमिका घेऊन कार्य करत राहणारे विचारवंत ज्या महाराष्ट्रात घडून गेले त्या महाराष्ट्रात मी घडलो याचा मला अभिमान आहे. महाविद्यालयीन जीवनापासूनच विविध चळवळींशी संलग्न असल्यामुळे, रझिया पटेल, अनघा संजीव, मंगल खिंवसरा यांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांसोबत काम केल्यामुळे स्त्री मुक्ती ते स्त्री पुरुष समानता हे स्थित्यंतर, आंतरजातीय विवाह, सामाजिक विषमता आदी विषय एक पत्रकार म्हणून, रंगकर्मी म्हणून जवळून अनुभवता आले आणि हीच गेल्या तीन ते चार  दशकांमधील बदललेली स्त्री माझ्या नाटकांमधून प्रतिबिंबित झाली.

      प्रशांत दळवी लिखित ‘चारचौघी’, ‘ध्यानीमनी’, ‘चाहूल’ या नाटकांमधून दाखवल्या गेलेल्या स्त्रीचा प्रवास हा पारंपारिक चौकटी तोडत स्वतःच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी बाहेर पडलेली ‘ती’ ते स्वतःच्या शोधात बाहेर पडलेली ‘ती’ असा झालेला दिसतो. ‘वाडा चिरेबंदी’ ‘मग्न तळ्याकाठी’ ‘युगान्त’ या नाटकांमधील स्त्रिया कोणत्याही सहनशीलतेचे आवरण न घेता स्वतःची तडफड सक्षमपणे व्यक्त करतात.

      आज मी जो काही घडलो आहे त्याचे सगळे श्रेय मी माझ्या आयुष्यातील प्रथम स्त्रीला म्हणजेच माझ्या आईला देतो. कमी शिकलेली, म्हणजे अगदी नवऱ्यालादेखील लग्नात पहिल्यांदाच बघितलंय अशी असणारी ती खूप दूरदृष्टीने विचार करणारी आहे. कुटुंबनियोजन, शिक्षणाचे महत्व तिला त्या काळात पटले होते. मला व माझ्या बहिणीला शिक्षण मिळावे म्हणून तिने औरंगाबाद गाठले. मी कलाक्षेत्रात येण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही तिने मला प्रोत्साहन दिले, आत्मविश्वास दिला. त्यामुळेच माझ्या कलाकृतींमध्ये प्रतिगामी, थकलेली स्त्री दाखवली जाणार नाही याची पुरेपूर खबरदारी मी घेतो. आई, बहिण, पत्नी, मैत्रीण या नात्यांकडे आपल्याला खुल्या दृष्टीने बघता यायला हवे, तिच्या प्रगतीचा सकारात्मक साक्षीदार होता यायला हवं, तिला पाठींबा देता यायला हवा असे कायमच मला वाटते. माझ्या ‘जिगीषा’ या संस्थेमध्ये देखील ‘स्त्री शक्ती’ जास्त असल्यामुळेच विविध विषयांना मला हात घालता आला. 

      आजच्या स्त्रीबद्दल जेव्हा मी विचार करतो तेव्हा गेल्या दोन, तीन दशकांमध्ये स्त्रीने कायदा, उद्योग, सामाजिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये स्वतःचा ठसा उमटवलेला दिसतो. आजची स्त्री ही अन्याय सहन करणारी नाही. तिच्या यशाचे संकेत हे निव्वळ लग्न, कुटुंब आणि संसार यांपुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत. त्यामुळे ‘स्त्री कर्तुत्वाचा’ सन्मान करणाऱ्या या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा!

  Facebook   Pinterest   Twitter   Google+
#9#Special99women9days
  • Sulajja Firodia Motwani
    October 17, 2018 · 0 comments
    "Sulajja Firodia Motwani" the lady is a super achiever. How else can you
    2698
    4
    Read more
  • Mahesh Kale
    January 12, 2017 · 1 comments
    Mahesh Kale, an Indian Classical Vocalist having trained under Pandit Jitendra
    5343
    28
    Read more
  • Sugandha Lonikar
    October 02, 2016 · 13 comments
    Sugandha Lonikar has risen from the ranks in the television industry and heads
    7349
    40
    Read more

Leave a Comment! Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts
  • Smita Kulkarni
  • Paula McGlynn
  • Shweta Shalini
  • sumitra bhave
  • Priyanka Sachdev
Categories
  • 9women9days Season 4
  • 9women9days Season 3
  • 9women9days Season 2
  • 9women9days Season 1
  • Game Changers
  • Music Concert
  • Vinod Satav
Recent Comments
  • Kailas deshmukh on Madhugandha Kulkarni
  • Prashant on साईड बिझनेस! उसमे क्या है?  
  • राहुल मच्छिंद्र जगताप on साईड बिझनेस! उसमे क्या है?  
  • Deepak Kadhav on साईड बिझनेस! उसमे क्या है?  
  • Vasant Vasant Limaye on साईड बिझनेस! उसमे क्या है?  
Copyright © 2020 Lead Media & Publicity. All Rights Reserved | Powered by Procommun