Devita Saraf
The first quote on the landing page of Devita’s official website reads “Success is about reaching for the sky and achieving your dreams, while being who you are truly. In my career as the Founder CEO of Vu Televisions, I have been taken seriously as a leader and entrepreneur in a male dominate industry while being unapologetically feminine.”
Devita has successfully built Vu into a Rs.500 crore company with over half a million TVs sold across the world. With 300 employees, 11 offices, 18 flagship stores and 800 retailers reaching consumers nationwide, Vu Televisions is the largest selling TV in India after global behemoths such as Sony, Samsung and LG. Clearly a woman of today, Devita took the bold decision to be the face of her brand and was called ‘The Model CEO’ by Forbes Magazine. She is passionate about leadership and gender equality, and has been propagating the role of Indian women in global business.
A lot of Leadership is a Private Journey of some hard hitting decision making. Do you agree?
Life is full of choices – I chose to leave my comfortable life at home at age of 18 and move to the US to study business and at age 24 I left the successful family business to start my own company Vu Televisions. You have to make the right choices for yourself and course correct if necessary, rather than follow society norms.
Were there any important mentors or influencers in your life that led you to your current position?
Definitely my father, who is an incredibly progressive and supportive person.
How do you think being a woman impacts your leadership style?
Ans: I am a lot more creative and personable in my approach, rather than a boring and aggressive style of growing business. I am known for my vision and innovation and a lot of that comes from my ability to think in colours, rather than just numbers. Also, youth connect very well with a successful young woman who is approachable and relatable.
What will be the biggest challenge for the generation of women behind you? What advice would you give a young woman starting out in her career?
Take your career seriously; no sacrifices in your life are worth risking a great career and education.
In times of stress, what is it that gives you solace?
Ans: Good conversation brings solutions to most problems.
A Woman Anchor in your life you would dedicate this interview too?
Devis – Indian goddesses always inspire me.
देविता सराफ
“ यश म्हणजे आभाळाला कवेत घेणं आणि स्वप्नं सत्यात उतरवणं, स्वत:ला आहे तसं स्वीकारणं. ” व्हीयु टेलिव्हिजनची” मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक म्हणून काम करताना माझ्या करिअरमध्ये एक उत्तम नेतृत्व आणि उद्योजक होण्याचा मी प्रयत्न केला, कारण हे संपूर्ण क्षेत्र पुरुषसत्ताक आहे, यामुळे एक स्त्री म्हणून मी कोणताही न्यूनगंड बाळगला नाही.”
देविता यांनी यशस्वीपणे व्हीयु टेक्नोलॉजीज नावाची ५०० कोटीची कंपनी उभी केली आहे. त्यांच्या कंपनीमध्ये ३०० कर्मचारी, ११ ऑफिस, १८ मुख्य स्टोअर्स असून ८०० रिटेलर्सचं जाळं ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सदैव सज्ज असतं. व्हीयु टेलिव्हिजन जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर विकले जाणारे टेलिव्हिजन असून यांचं मार्केट सोनी, सॅमसंग आणि एलजी यांच्या तोडीचं आहे. व्हीयूचा ब्रँड तयार करण्यासाठी त्यांनी अनेकदा धाडसाने निर्णय घेतले आहेत. फोर्ब्ज मासिकाने त्यांना आदर्श सीईओचं उत्तम उदाहरण म्हणून नावाजलं आहे. उत्तम नेतृत्व आणि स्त्री पुरूष समानतेविषयी त्या आग्रही आहेत. जागतिक पातळीवर भारतीय उद्योजक स्त्रीची प्रतिमा मजबूत करण्याचं काम त्यांनी केलं आहे.
असं म्हणतात की एक चांगला लीडर म्हणून आयुष्यात अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतात. लीडरशीप आणि डिसिजन मेकिंग बद्दलचे तुमचे अनुभव सांगा.
आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात की जिथे तुमचे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात. वयाच्या १८ व्या वर्षी बिझनेस मॅनेजमेंट शिकायला घर सोडलं आणि ‘US’ ला गेले. त्यानंतर माझी स्वतःची कंपनी – ‘Vu Televisions’ सुरु करण्यासाठी वयाच्या २४ व्या वर्षी अतिशय यशस्वीरित्या चालू असलेला फॅमिली बिझनेस सोडला. त्यामुळे स्वतःसाठी योग्य तो निर्णय घेणारे आपण स्वतःच असतो यावर माझा ठाम विश्वास आहे. समाज काय म्हणेल याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला काय हवे आहे याचा विचार करून निर्णय घ्यायचा असतो.
एक ‘बिझनेस वूमन’ म्हणून घडताना तुमच्यावर सगळ्यात जास्त कोणाचा प्रभाव आहे?
माझे बाबा माझे आदर्श आहेत. ते खूप प्रोग्रेसिव्ह विचारांचे आहेत. त्यांनी वेळोवेळी दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी यशस्वी होऊ शकले.
स्त्री असल्याचा तुमच्यातील नेतृत्वशैलीवर कसा परिणाम होतो?
बिझनेस संदर्भात कोणताही निर्णय घेताना मी परंपरागत निर्णय घेण्यापेक्षा जास्तीत जास्त क्रिएटिव्ह निर्णय घेण्याचा प्रयत्न करते. I am known for my vision and innovation and a lot of that comes from my ability to think in colors, rather than just numbers. तुम्ही जर विचारांनी तरुण असाल तर तरुण पिढी तुमच्याशी सहजपणे कनेक्ट होऊ शकते.
तुमच्या मते आजच्या तरुणींपुढे काय आव्हाने आहेत? आणि तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन देऊ इच्छिता?
करिअरचा गांभीर्याने विचार करा. आयुष्यात करिअर आणि शिक्षणापेक्षा काहीच महत्वाचे नाही.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीचा मनावर जो ताण येतो तो घालवायला काय करता?
सुसंवादाने प्रत्येक समस्या सोडवता येते. त्यामुळे कधीही एखादी मोठी अडचण आली तर ती संवाद साधून सोडवण्यावर माझा भर असतो.
ही मुलाखत तुमच्या आयुष्यातील सगळ्यात प्रेरणादायी स्त्रीला समर्पित करायची असेल तर कोणाला समर्पित कराल?
भारतीय पुराणशास्त्रात वर्णन केलेल्या देवी मला कायम प्रेरणा देतात, त्यामुळे ही मुलाखत मी त्यांना समर्पित करू इच्छिते.
Amazing success story
Truly inspiring! Thanks for sharing Lead!