Preeta Sukhtankar
With a passion & flair for writing, Preeta began her career working part time for Sunday Observer while she was a student of Xavier’s, Mumbai. She has worked with Elle magazine, with MTV as a writer for their MTV’s Most Fashionable and led the MTV Talent Hunt show and then later on worked with celebrity management firm Kwan.
Preeta is in an interesting position currently. She started The Label Life (The Label Corp) in 2012 and in a short span of 5 years has exploded in the e-commerce world!
The Label Life has a home decor category, which is led by Sussanne Khan. Home was the first category to be launched. The clothing category is led by Malaika Arora. And in 2013 Bipasha Basu joined to be the head of the accessories and shoes category. In 2014, they partnered with Amazon India. And today, The Label Life has over 50 employees.
She has combined her experience of working in media, branding and celebrity management to start her venture with an interesting premise of having a strong editorial content and giving the connect of a personalized shopping experience. This concept has worked extremely well on the platform.
In her words “I wanted to fill that gap and provide users with India’s first editorial e-commerce brand. We do not want celebrities to endorse our brand. Instead, we want experts in the field to style and curate products. We are a taste-maker led e-commerce store”
A lot of Leadership is a Private Journey of some hard-hitting decision making. Do you agree?
Entrepreneurship is hard. It can be overwhelming. The words conviction and passion come much later on really. So when we started it was not with a clear road map but with my experience in the field of fashion, content and celebrity management, it all eventually came together and the personality of our brand evolved. The brand is for women of today who earn, is well travelled and has an exposure to the world. We The Label Life are distinctly different in terms of giving editorial connect and guidance and introducing and presenting items that are in sync with what young women want. Entrepreneurship is a journey and in the process you build up a community. We engage with our customers and followers. We are trying to build a brand and this is a long-term haul and we are certainly not the fly-by-night market place operators.
When we began, we were not sure what we were doing and then decisions needed to be taken because it just had to be! The core team of The Label Life is intact after so many years! When there were cash flows problems, some of my dear colleagues came and said don’t pay now and that means a lot! It is a community that was created and for me it was important.
So more than me it was the journey that we all got into together and things are getting interesting.
Were there any important mentors or influencers in your life that led you to your current position?
As we age and mature it is all about parenting. You suddenly start looking into the past and then the significance of things dawn.
My sister and I both got married young and had love marriages. Eventually as my friends began marrying I remember the questions that their families would ask like what was the groom’s occupation, how much does he earn and which car did he own etc. And I do remember asking my father much later and asking in an almost accusatory way as to why he never asked us these questions? Was he not interested in what we were doing? His answer was simple. Why should I ask?! I have raised my young daughters to be independent and sensible women who would take decisions based on their own judgment. It now strikes me that what he said then was all about Mentoring. For him it was simple- he had raised his daughters to be independent thinkers.
My mother was a home maker. Every time I returned from school she would be standing there to receive me and my sister and taking care of every need and then being organized about our tuition, hobby classes etc. There was care and planning and so much work on her part.
My parents in their own way have been my mentors and my influencers.
How do you think being a woman impacts your leadership style?
I have had female bosses right from my first job. I have worked very well with women. They were all fabulous and remain my friends till date.
I have had such great male influences as well. They have been excellent with women around them and I do feel that the vibes, energy that you send do get likeminded people around you.
I have imbibed all influences. These associations are more like partnerships. Marriage, relationship is like a partnership with equal responsibility. Its equal workload we are talking about.
Women I worked with were hardworking bright and independent women. Like my Angel investor Vani Kola of Kalaari Capital , a fabulous women with 2 daughters. Vani has been an exceptional influence. These are the kind of women who should be exalted for the work they are doing and the balanced way they are leading and living their lives. Interested in work, passionate about exercise and being fit, well read and travelled and they make their mark and difference in their spheres!
So I give a lot of importance to balancing out things in life and absorbing the positive energies around from circle of people.
What will be the biggest challenge for the young generation behind you? What advice would you give a young woman starting out in her career?
There are so many challenges. Again it is to do with parenting too. There is simply too much of protective parenting. It’s killing ambition at least in an urban set up that we are in. There is so much of Self entitlement and applauding mediocrity in kids! It’s like they are told you are best! Thoda Struggle accha hai. I am looking at Tier 2 and Tier 3 candidates coming up for jobs and they will be the ones to look out for! The guys and girls will succeed with the kind of ambitious energy they are generating.
Who is your role model?
My elder sister, Shweta. She has a great marriage and a terrific job and works in Paris. She is my role model for her ability to be able to be in touch with all of us here on a daily basis! It must take a lot out of her to manage and juggle her work and life and yet be in touch with us every day! She will talk to my mom an me and keep in touch with what is happening in our lives and that is what makes her a special woman.
प्रीता सुखटनकर
मुंबईच्या झेवियर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच लेखनाची आवड असल्यामुळे ‘संडे ऑब्जर्व्हर’मध्ये प्रीता यांनी अर्धवेळ काम करण्यास सुरुवात केली. यानंतर एमटीव्हीच्या ‘एल’ मासिकासाठी सुध्दा त्यांनी काम केलं. एवढंच नाही तर एमटीव्हीच्या लोकप्रिय हंट शो साठी काम करण्याची त्यांना संधी मिळाली. यानंतरचा पुढचा टप्पा होता तो म्हणजे ‘क्वान’या सेलिब्रिटी मॅनेजमेंट फर्मसाठी काम करण्याचा.
२०१२ साली स्थापन झालेल्या आणि केवळ पाच वर्षाच्या अल्प कालावधीत ई कॉमर्सच्या जगात प्रचंड मोठी झेप घेणा-या ‘द लेबल लाईफ’ या कंपनीच्या माध्यमातून प्रीता यांनी पुन्हा एकदा स्वत:ची क्षमता सिद्ध करून दाखवली. ‘द लेबल लाईफ’ ने सर्व प्रथम होम डेकोर विभाग सुरू करून बाजारात प्रवेश केला, आणि या विभागाची धुरा सुझेन खान सांभाळते. 'क्लोथिंग' विभाग हा मलाईका अरोरा यांच्या नेतृत्वाखाली चालविण्यात येतो. २०१३ मध्ये ‘अॅक्सेसरीज आणि शूजच्या’ विभागात प्रमुख म्हणून प्रसिध्द आणि लोकप्रिय अभिनेत्री बिपाशा बासूने पाऊल ठेवलं. ‘द लेबल लाईफ’ कंपनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा म्हणजे २०१४ साली अॅमेझोन इंडियासोबत कंपनीची असलेली भागीदारी. आज ‘द लेबल लाईफ’ कंपनीत ५० कर्मचारी कार्यरत आहेत.
माध्यमं, ब्रॅडिंग आणि सेलिब्रिटी मॅनेजमेंट अशा तिन्ही क्षेत्राचा अनुभव असलेल्या प्रीता यांनी आपल्या ज्ञानाचा वापर कंपनीसाठी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने केला आहे. त्यांची ही संकल्पना कल्पनेपेक्षा जास्त यशस्वी ठरली आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर “ मार्केटमध्ये असलेली गॅप ओळखून ग्राहकांना उत्तम ते देण्याचा माझा प्रयत्न आहे, यासाठी माहितीपूर्ण ज्ञानाची ओळख असलेला भारताचा हा पहिला ई कॉमर्स ब्रँड आहे. आमच्या ब्रँडच्या जाहिरातीसाठी सेलिब्रिटीची गरज नाही. त्या क्षेत्रातील तज्ञच ग्राहकांना त्या प्रॉडक्टची ओळख करून देण्यास पुरेसे आहेत. म्हणूनच आम्ही मार्केटची चव आणि स्टाईल निर्माण करणारे ई कॉमर्स स्टोअरमधील आघाडीचे ब्रँड आहोत.”
उत्तम नेतृत्वासाठी वैयक्तिक पातळीवर घेण्यात आलेले ठाम निर्णय कारणीभूत ठरतात, याविषयी तुमचं मत काय आहे ?
उद्योजकता ही खूप अवघड असते, ती मिळवण्यासाठी अनेक अडथळयांवर मात करावी लागते. तुमची त्या क्षेत्राबद्दलची जाण, आवड आणि शर्थीचे प्रयत्न हे शब्द अक्षरश: खरे ठरतात. स्वत:ची कंपनी सुरू करण्याचा मार्ग निश्चितच सोपा नव्हता. माध्यमाचं ज्ञान, फॅशन आणि सेलिब्रिटी मॅनेजमेंट या तीनही क्षेत्रामुळे हा ब्रँड उभा राहिला. आमचा ब्रँड हा आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र, पर्यटनाची जाण असलेल्या आणि जगाचं एक्सपोजर मिळालेल्या स्त्रीसाठी आहे. इतर ब्रँडच्या तुलनेत ‘द लेबल लाईफ’ ब्रँड वेगळा असण्याचं कारण म्हणजे एखाद्या प्रॉडक्टची तज्ञाकडून माहिती करवून देणे. मार्गदर्शन आणि त्या प्रॉडक्टची ओळख, सादरीकरण करणे गरजेचं आहे, जे आजच्या स्त्रीला हवं आहे. उद्योजकता हा एक प्रवास असून या निर्मिती प्रक्रियेमध्ये नव्या समाजाची उभारणी होते. यासाठी आम्ही आमच्या ग्राहकांना आणि फॉलोअर्सना वेळ देतो. ब्रँड निर्मिती ही एका रात्रीत होणारी गोष्ट नाही तर ती सातत्याने सुरू राहणारी गोष्ट आहे. आम्ही जेव्हा आमच्या कामाला सुरुवात केली तेव्हा आम्ही जे करतो आहोत ते मार्केटमध्ये ग्राहकांच्या पसंतीस उतरेल की नाही याविषयी आम्हाला खात्री नव्हती. नंतर मात्र आम्ही आमच्या निर्णयांवर ठाम राहिलो. आणि एक ब्रँड निर्माण झाला. लेबललाईफची कोअर टीम हा कंपनीचा पाया आहे. नोटबंदीच्या काळात जेव्हा काही अडचणी आल्या तेव्हा या टीमने खूप सपोर्ट केला. हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे हा माझ्या एकटीचा प्रवास नाही तर सर्वांनी मिळून केलेला हा यशस्वी ब्रँड आहे, आणि यानंतर ही हा प्रवास असाच सुरू राहील.
हे यश मिळवण्यासाठी तुमच्या आयुष्यावर कोणाचा प्रभाव आहे का ? तुमचा कोणी मार्गदर्शक आहे का ?
वयाने आणि अनुभवाने आपण जसे मोठे होत जातो तसं आपल्याला आपलं संगोपन आठवत राहतं. मी आणि माझी बहीण आम्ही दोघींनी लवकर लग्न केलं. दोघींचे प्रेमविवाह आहेत. माझ्या मैत्रिणींची लग्न होऊ लागली तेव्हा मला आठवतं की मुलाची नोकरी किंवा व्यवसाय कसा आहे. तो किती कमावतो, त्याच्याकडे कार, घर आहे का, असे प्रश्न विचारले जात. मात्र आमच्या बाबतीत तर असं झालंच नाही म्हणून आमच्या निर्णयावर मी माझ्या वडीलांना एकदा प्रश्न विचारला होता की असे प्रश्न त्यांनी आमच्याबाबतीत का विचारले नाही ? आम्ही काय करत आहोत याविषयी त्यांना काहीच वाटलं नाही का ? यावर माझ्या वडिलांनी दिलेलं उत्तर साधं मात्र तेवढंच विचार करण्यासारखं होतं. मी माझ्या मुलींना समंजस, स्वतंत्र व्यक्तिमत्व समजून वाढवलं आहे. तेव्हा त्या त्यांचे निर्णय योग्य पद्धतीने घेऊ शकतात यावर माझा ठाम विश्वास आहे. मला आज असं वाटतं की या विचारसरणीचा माझ्यावर प्रभाव आहे. त्यांच्या दृष्टीने त्यांचं उत्तर सोपं होतं. स्वतंत्र विचारसरणी असलेल्या मुली त्यांनी वाढवल्या आहेत. माझी आई गृहिणी आहे. आम्ही जेव्हा शाळेतून घरी येत असू तेव्हा आमच्या दोघींची ती वाट पाहत असे. आमचं हवं नको ते बघणं, अभ्यासाबरोबरच आमच्या शिकवण्या, छंद वर्गाना जाणं सारं ती पाहत असे. आमच्या संगोपनाचं उत्तम नियोजन आणि काळजी तिच्याकडे होती. थोडक्यात सांगायचं झालं तर माझे पालक हेच माझे मार्गदर्शक आहेत.
तुमच्या नेतृत्वाच्या शैलीवर स्त्री अधिका-यांचा प्रभाव आहे, असं तुम्हाला वाटतं का ?
माझ्या पहिल्या नोकरीपासून मी वरिष्ठ स्त्री अधिका-यांच्या हाताखाली काम केलं आहे. त्या सर्वजणी उत्तम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि आजही त्या माझ्या मैत्रिणी आहेत. याचबरोबर माझ्या कामाच्या शैलीवर पुरूष अधिका-यांचा तेवढाच प्रभाव आहे. त्यांच्यासोबत काम करणा-या स्त्रियांशी त्यांची असलेली वागणूक, सकारात्मक उर्जा आणि आशावाद यांचा माझ्या व्यक्तिमत्वावर प्रभाव आहे. या सर्व प्रभावांनी मिळून माझी नेतृत्वशैली विकसित झाली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. हे एखाद्या उत्तम भागीदीरीप्रमाणे आहे असं मला वाटतं. लग्न, नाती ही जबाबादारीने निभवायची भागीदारी आहे. आजवर मी ज्या स्त्रियांसोबत काम केलं त्या सर्व स्त्रिया कष्टाळू, बुध्दिमान आणि स्वतंत्र स्त्रिया होत्या. माझ्या कंपनीच्या मोठ्या गुंतवणूकदार ‘कलारी कॅपिटल’ च्या वाणी कोला या एक उत्तम अधिकारी असून त्यांना दोन मुली आहेत. त्यांच्या चांगुलपणाचा सुध्दा माझ्यावर मोठा प्रभाव आहे. अशा स्त्रिया स्वत: उत्तम काम करतातच शिवाय इतरांना सुध्दा प्रेरणा देण्याचं काम करतात. म्हणून आयुष्यात वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर संतुलन साधणे आणि आजुबाजूच्या लोकांमध्ये असणारी सकारात्मक उर्जा ग्रहण करणे याला मी खूप महत्व देते.
आजच्या तरुण पिढीसमोर कोणती मोठी आव्हानं आहेत ? आजच्या तरुण स्त्रियांना तुम्ही करिअर संदर्भात कोणता सल्ला द्याल ?
आजच्या तरुण स्त्रीसमोर खूप मोठी आव्हानं आहेत त्यापैकी एक महत्वाचं आव्हान म्हणजे पालकत्व. यामुळे आपण ज्या शहरी भागात राहतो तिथल्या करिअरमधल्या महत्वाकांक्षा संपवण्याचं काम होऊ शकतं. अर्थात करिअर करणा-या पालकांमुळे मुलं स्वतंत्र होतात हा मुद्दा सुध्दा नाकारून चालणार नाही. मी अशा नवोदित मुला-मुलींना नोकरीच्या मुलाखतीच्या निमित्ताने भेटत असते. आजच्या तरुण पिढीमध्ये खूप उर्जा आहे जी त्यांना करिअरसाठी आवश्यक आहे.
तुमचा आदर्श कोण आहे ?
माझी मोठी बहीणस श्वेता ही माझी आदर्श आहे. तिचं लग्न झालं असून ती उत्तम काम करते आहे. ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर यशस्वी आहे. ती पॅरिसमध्ये असते. ती माझी आदर्श आहे कारण कितीही व्यस्त असली तरी ती दररोज सर्वांच्या संपर्कात असते. आपलं काम आणि आयुष्य यामध्ये असा सुवर्णमध्य साधणं खूपच दुर्मिळ आहे. माझ्याशी आणि आईशी तिचं नेहमीच बोलणं होत असतं. यामुळेच माझ्या आयुष्यात तिची जागा विशेष आहे.
Recent Comments