Radhika Sunil Phadke
Radhika Phadke, joined as a Police Sub Inspector (PSI) in 1990 after having cleared her MPSC and securing 3rd Rank (All Maharashtra). During the 1993 Mumbai Blasts she was posted at MRA marg police station and demonstrated outstanding bravery in managing post riot situation.
An experienced officer she has worked for the ACB (Anti Corruption Bureau) Division. An excellent team player, she has contributed towards over 250 trap cases and house searches.
She is currently heading the Cyber Crime Division for Pune Police.
A lot of Leadership is a Private Journey of some hard hitting decision making. Do you agree?
Decisions need to be taken depending on situations. There are times when unhappy decisions are warranted but are essential. These are the times when one needs to be strong to take decisions fearlessly. I believe that this is an important quality to progress in your career. It is essential to have self belief and the conviction to take bold decisions.
Were there any important mentors or influencers in your life that led you to your current position?
There was no background of MPSC or civil services in my family. I do not recall being influenced by a person but what influenced me were situations around me while I was growing up. My sister who is 10 years elder to me was called by Bank of Maharashtra for interview and she made a decision not to take up the offer since her husband did not want a working woman at that time as a wife. I was in my 10th standard and was shocked that she did not take up the offer or stagger it by couple of years since there was a provision where she could have joined after 2 years. That perhaps was a turning point in my life and in my way of thinking. I became determined that I would be an independent working and earning women first with a career and only then think of marriage. I turned to myself and my self belief and perhaps to become my own inspiration.
I was a kabbadi player and my friend got selected as a PSI. It was an inspiration for me to give MPSC exams and I came 3rd in Maharashtra and got selected and then on there was no turning back. Incidentally my mother was against it and she in fact tore my application form but I refilled the form and went on to do what I had set my sights on.
How do you think being a woman impacts your leadership style?
I did not face a challenge as a Women leader. There are different styles of Leadership. I am an inclusive leader. No two persons are alike. To gauge the best quality of a person and engage him/her and utilize their strengths is what normally works for me. To have motivated people working under you gives far excellent output than stressed team members. I personally do not like to function under enormous stress and heading a cyber crime cell, one needs to be alert, vigilant and meticulous in processes. While I take decisions, they are based on my expertise and core competence and I do believe in equality when it comes to decision making.
Cyber crime is all about research and systematic processes. When a team is motivated to work, giving them an open hand is what I believe in.
What will be the biggest challenge for the generation of women behind you? What advice would you give a young woman starting out in her career?
There will be bigger challenges for them. I am talking of the entire new generation and not necessarily women. Times are getting complicated. Conventional crime (robbery, murder etc.) and cyber crime are two types of crime prevailing. Cases in cyber crime are the most reported cases in Pune city and are growing exponentially. Major cases are getting registered in Pune more than Mumbai, Delhi etc. This is a peculiarity of Pune city. This requires getting new training skills to solve cases and cope up with new challenges.
In times of stress, what is it that gives you solace?
I do Suryanamaskar, I read Bhagvad Gita that gives me solace and peace.
A Woman Anchor in your life you would dedicate this interview too?
My Mother.
राधिका सुनील फडके
राधिका फडके यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९९० मध्ये महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षेच्या गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक पटकावून पोलीस उपनिरीक्षक या पदापासून केली. त्यांनी १९९३ मध्ये मुंबई येथे झालेल्या बॉम्बस्फोटादरम्यान ‘एम.आर.ए. मार्ग’ येथील पोलीस स्थानकात कार्यभार सांभाळत असताना बॉम्बस्फोटानंतरची दंगलसदृश परिस्थिती अतिशय कौशल्याने हाताळली होती. त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात देखील अधिकारीपदावर काम केले आहे. अनेक ‘ऑन फिल्ड केसेस’ देखील त्यांनी अतिशय सक्षमपणे हाताळल्या आहेत. सध्या त्या पुणे येथे सायबर क्राईम डिव्हिजनच्या मुख्य म्हणून कार्यरत आहेत.
असं म्हणतात की एक चांगला लीडर म्हणून आयुष्यात अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतात. लीडरशीप आणि डिसिजन मेकिंग बद्दलचे तुमचे अनुभव सांगा.
प्रत्येक निर्णय हा त्यावेळच्या परिस्थितीचा अभ्यास करून घ्यायचा असतो. कधी कधी आपल्याला मनाविरुद्ध निर्णय घ्यायला लागतात पण ते त्या परिस्थितीत गरजेचे असतात. माझ्या कार्यक्षेत्रात खूप नीडर राहून आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्यावे लागतात. तुम्हाला जर यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःवर विश्वास असायला हवा आणि घेतलेला निर्णय योग्य ठरवण्याची धमक तुमच्यात असायला हवी .
तुमच्या आयुष्यातील अशी प्रभावी व्यक्ती सांगा जिच्यामुळे तुम्हाला हे यश संपादित करण्याची प्रेरणा मिळाली.
माझ्या घरी कोणीच ‘नागरी सेवा परीक्षा’ किंवा ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा’ दिलेल्या नाहीत. मला कोणाही व्यक्तींपेक्षा मी अनुभवलेले प्रसंग जास्त प्रोत्साहित करतात. मला लक्षात राहिलेला प्रसंग म्हणजे माझी बहिण माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. मी १० वीत असताना तिला ‘बॅंक ऑफ महाराष्ट्र’ नोकरी मिळत होती पण तिच्या नवऱ्याला नोकरी करणारी बायको नको होती या एकमेव कारणामुळे तिने ती स्वीकारली नाही. त्यावेळी तिच्या या निर्णयाचा मला खूप मोठा धक्का बसला होता. आणि त्या प्रसंगानंतर मी माझ्या मनाशी ठरवून टाकले होते की मी आधी स्वतःच्या पायावर उभं राहून आत्मनिर्भर होईन आणि मगच लग्नाचा विचार करेन. तो प्रसंग माझ्यासाठी प्रेरणादायी प्रसंग होता.
मी कबड्डीची खेळाडू होते आणि माझी एक मैत्रीण त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू झाली. तिला बघून मला पण महाराष्ट्र सेवा परीक्षा देण्याची इच्छा झाली. मी परीक्षा दिली आणि फक्त उत्तीर्णच नाही तर महाराष्ट्रात ३ री आले. माझी आईचा माझ्या या निर्णयाला विरोध होता.
स्त्री असल्याचा तुमच्यातील नेतृत्वशैलीवर कसा परिणाम होतो?
मला कधीच निव्वळ मी स्त्री आहे या एकमेव कारणामुळे विशेष आव्हानांना सामोरे जावे लागले नाही. आपण जेव्हा अधिकारी पदावर काम करत असतो तेव्हा आव्हाने ही येतंच राहतात. मला माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेत काम करायला आवडते. प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. त्यामुळे मी प्रत्येकातील सकारात्मक गुण हेरून त्यांना आवडेल आणि जमेल अशा कामांमध्ये सहभागी करून घेते. कर्मचाऱ्यांवर कामाचा दबाव टाकण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहित करण्याकडे माझा कल असतो. मला स्वतःला तणावपूर्ण वातावरणात काम करायला आवडत नाही. ‘सायबर क्राईम डिव्हिजनमध्ये’ काम करताना तुम्ही सतत जागरूक, कामामध्ये तत्पर असणे अपेक्षित असते. तुम्हाला अद्ययावत माहिती असणे अपेक्षित असते. आणि त्यामुळे या डिव्हिजनमध्ये काम करताना तुमची ‘टीम’ देखील तितकीच जागरूक, काम करण्यास तत्पर असणारी असायला लागते. म्हणून मी नेहमी माझ्या सहकाऱ्यांना त्यांना अपेक्षित असणारे सहकार्य आणि काम करण्याचा मोकळेपणा देते.
तुमच्या मते आजच्या तरुणींपुढे काय आव्हाने आहेत? आणि तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन देऊ इच्छिता?
गोष्टी खूप झपाट्याने बदलत चालल्या आहेत. त्यामुळे येणारा काळ हा अधिकाधिक आव्हानात्मक होत चालला आहे. समाजातील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. आणि गुन्हयांचे स्वरूप देखील बदलत चालले आहे. सर्वाधिक सायबर गुन्हे नोंदवल्या जाणाऱ्या शहरांमध्ये पुण्याचा समावेश होतो. त्यामुळे नवनवीन स्किल्स असणाऱ्या आणि आव्हानात्मक कामे करू इच्छिणाऱ्या तरुण पिढीची सद्ध्या गरज आहे.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीचा मनावर जो ताण येतो तो घालवायला काय करता?
मी सूर्यनमस्कार घालते, भगवद्गीता वाचते त्यामुळे माझ्या मनाला खूप शांतता लाभते.
ही मुलाखत तुमच्या आयुष्यातील सगळ्यात प्रेरणादायी स्त्रीला समर्पित करायची असेल तर कोणाला समर्पित कराल?
माझी आई!
Recent Comments