Lead Team - We managed to speak for couple of minutes only to Lieutenant Swati Mahadik. The lady is brave and a true example of how women prevail in their circumstances and work around insurmountable obstacles to emerge stronger in mind and body.
We are proud of you, officer!
Swati Mahadik
Swati Mahadik is a commissioned Officer of the Army having trained at the Officers Training Academy in Chennai. Swati is the wife of late Colonel Santosh Mahadik. Colonel Mahadik, the commanding officer of 41 Rashtriya Rifles, was killed in a counter-infiltration operation in the Manigah forest of Kupwara district
She completed a grueling training session of 11 months. After undergoing several rounds of other physical fitness and medical examinations as part of the five-tiered selection process, she was selected to join the Officers Training Academy in Chennai. It is an inspiring example of grit and courage.
She completed her OTA training and took part in the passing-out parade to join the Indian Army as a Lieutenant in the Army Ordnance Corps.
To quote her "When you lose someone who is close to you it hurts. His (Colonel Mahadik) first love was his uniform and his unit, so I just had to wear this. It just happened and I did not even work harder for this. Even my family was with me, so I knew I would be able to do it. After wearing this uniform, I want to know what work has to be done and I will learn it"
Prime Minister Narendra Modi recently congratulated the newly commissioned Lieutenant in his address to the nation.
38 year old Swati Mahadik took the decision to send her children to boarding school. Son Swaraj in Panchgani and daughter Kartikee in Dehradun.
She is ready to take the next step.
A lot of Leadership is a Private Journey of some hard-hitting decision making. Do you agree?
Decisions need to be taken which are right and true. That is what Leadership is all about. For me personally being a female has not really made a difference. Decisions are dependent on priorities prevailing at that time.
Leadership & decision making ability shall become a part of my life once I get posted on the field. I have finished my training in the army currently and my journey has only begun.
What will be the biggest challenge for the generation of women behind you? What advice would you give a young woman starting out in her career?
Youth have so many opportunities now. I feel they will face lesser challenges. The exposure that they are getting and the kind of avenues open for them is exciting.
A woman anchor in your life you would dedicate this interview too?
My grandmother has been my biggest support and inspiration.
लेफ्टनंट स्वाती महाडिक
लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्याशी संवाद साधण्याची संधी लीड समूहाला नुकतीच मिळाली. कितीही अडथळे आणि संकटं समोर उभी राहिली तरी धडाडीने स्त्री त्यामधून कसा मार्ग काढू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे लेफ्टनंट स्वाती महाडिक.
ऑफिसर आम्हाला तुमचा अभिमान आहे !
स्वाती महाडिक या लेफ्टनंट म्हणून नुकत्याच भारतीय लष्करात दाखल झाल्या आहेत. त्यापूर्वी अकरा महिन्याचं खडतर लष्करी प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं असून चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये होणा-या दिमाखदार दीक्षांत सोहळयात स्वाती महाडिक लेफ्टनंटपदी रुजू झाल्या. स्वाती महाडिक या काश्मीरच्या कूपवाडा येथे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी असून यांच्या निधनानंतर स्वाती यांनी लष्करात सेवा करण्याचा निश्चय बोलून दाखवला होता. तेव्हापासून त्यांनी लष्करात दाखल होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. अकरा महिन्याच्या खडतर लष्करी प्रशिक्षणात त्यांनी निवड चाचण्या यशस्वीपणे पार केल्या. स्त्रीच्या निर्धाराचं आणि धाडसाचं हे प्रेरणादायी उदाहरण आहे.
स्वाती महाडिक यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यावर भारतीय लष्करात लेफ्टनंट म्हणून सूत्रं हातात घेतली. त्यांच्या या यशाविषयी बोलताना स्वाती म्हणाल्या, “तुम्ही जेव्हा जवळचं माणूस गमावता तेव्हा ते तुमच्यासाठी खूप दु:खदायक असतं. माझे पती कर्नल महाडिक यांचं पहिलं प्रेम त्यांची वर्दी आणि त्यांचं युनिट होतं. त्यांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न मी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. माझ्यासोबत कुटूंबाचा पाठिंबा होता म्हणून मी हे स्वप्न पूर्ण करणार असा मला विश्वास होता. आता हा युनिफॉर्म घातल्यानंतर माझ्या कामाची मला सतत आठवण राहील”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुध्दा नुकतंच राष्ट्राला उद्देशून संदेश देताना नव्याने लष्करात दाखल झालेल्या वीरांगना लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचं कौतुक केलं आहे.
३८ वर्षे वयाच्या स्वाती महाडिक यांनी आपल्या मुलांना बोर्डिंगमध्ये ठेवून देशसेवेत उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला, याचं समाजातल्या सर्व स्तरांतून कौतुक होतं आहे. त्यांचा मुलगा स्वराज हा पाचगणीला तर कार्तिकी डेहराडून येथे शिक्षण घेत आहे.
स्वाती महाडिक यांच्याशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून झालेला हा संवाद
एका उत्तम नेतृत्वासाठी वैयक्तिक पातळीवर घेण्यात आलेले धाडसी निर्णय करणीभूत ठरतात, याविषयी तुमचं काय मत आहे?
निर्णय घेताना ते योग्य आणि खरे असायला हवेत तर ते उत्तम नेतृत्व म्हणता येईल. वैयक्तिकरित्या बोलायचं झाल्यास एक स्त्री म्हणून माझ्यासाठी परिस्थिती काही वेगळी नव्हती. तुमच्या प्राधान्यक्रमावर निर्णय अवलंबून असतात. लष्करात दाखल झाल्यावर आता नेतृत्व आणि निर्णयक्षमता या माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाल्या आहे. मी प्रशिक्षण संपवून लष्करात नुकतीच दाखल झाले आहे. थोडक्यात माझा प्रवास आता सुरू झाला आहे.
आजच्या पिढीच्या स्त्रियांसमोर कोणतं मोठं आव्हान आहे ? या तरुण स्त्रियांना तुम्ही करिअरसाठी कोणता सल्ला द्याल ?
आज तरुण स्त्रियांना खूप मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. मला वाटतं त्या तुलनेने आव्हानं कमी आहेत. या तरुण पिढीला ज्या संधी आणि नवीन क्षेत्र जी खुली झाली आहेत त्यामध्ये काम करणं खूपच चांगला अनुभव असणार आहे.
ही मुलाखत तुम्ही कोणाला समर्पित करू इच्छिता ?
माझ्या आजीला ही मुलाखत समर्पित करू इच्छिते कारण ती माझ्यासाठी भक्कम पाठिंबा देणारी प्रेरणास्त्रोत आहे.
Recent Comments