Ashwini Deshpande
Co-founder - Elephant Design
Ashwini is a graduate of National Institute of Design, Ahemadabad (NID) and a co-founder of Elephant Design, India’s largest independent integrated design consultancy with offices in India and Singapore.
She has done award-winning work for global brands in automobile, engineering, FMCG, food service, healthcare & personal care segments. Some of the awards include Global ReBrand 100 (USA), Asiastar for Packaging Excellence (Singapore), A’Design Awards (Italy), Best of the Best at CII Design Excellence, Designomics, The India Story award etc
Ashwini was invited by Rockefeller Foundation to participate in a global Social Impact summit and by Danish Design Foundation to partner with Copenhagen Co-creation Agenda. She has lectured across more than 20 countries including icograda Design week in Vancouver & Istanbul, Business of Design week in Hong Kong and International Design Congress at Mexico as well as in South Korea more recently.
She has been a jury member on Cannes Lions (France), Global ReBrand 100 (USA), Spikes Asia (Singapore), Design for Asia (HK), Kyiv International Advertising Festival (Ukrain) & Design for Change (India) Awards and was part of the International A’Design Awards (Italy) jury this year.
It is a feeling of pride to have Ashwini Deshpande for the #9Women9Days season 3. We are indeed honoured and happy to feature her.
What am I known for ? OR What I am known to be?
I am known as a designer & co-founder of Elephant, India’s top ranked pioneering design consultancy.
The one advise I would give to my younger self on professional and personal front
There is never an ideal moment for starting anything. So if you want to do something, start immediately.
A tough decision that I needed to take as a Leader and its impact on me
Learning to delegate was a tough step as a designer, but was necessary as a leader since I wanted to see Elephant grow.
Delegating started with smaller tasks where I learnt how it is important to define the basics, but is equally important to leave some freedom for the team members to take & own their decisions. This grew into handing over larger responsibilities like financial decisions, relationship management and design direction to capable and talented colleagues. It strengthened the team spirit within the team. Through delegation, I managed to find time for keeping myself aligned with global trends & practices that I could share with team. I also managed to focus on spreading awareness about design profession through delivering talks, conducting workshops, writing articles and volunteering for Association of Designers of India.
Biggest learning from my parents
Staying rooted and optimistic.
What has been the biggest challenge/s at work and what did you learn from it?
Design is one of the most undervalued interventions in Indian business ecosystem despite the fact that Apple, world’s first trillion dollar company vouches by the value it has created through great design. Biggest challenge has been to make businesses understand the value of design as an intrinsic part of the process and not just as a superficial, cosmetic makeover. Here, my learning is that if you want to see any change in mindsets & attitudes and prove the worth of your profession, you have to demonstrate it through success stories of clients. And for that you have to consistently work with empathy and honesty in solving problems through design thinking.
An accomplishment you are proud of?
It has been a long journey of nearly 30 years of pioneering design practice in India. To not only start a multidisciplinary design consultancy, but to also grow it to a scale, manage to groom & retain some of the best talent and to get global recognition… I believe that is the greatest accomplishment. I am proud of the team and the company we have built.
अश्विनी देशपांडे
सहसंस्थापक - एलिफंट डिझाईन
अश्विनी देशपांडे अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ डिझाईन अर्थात एनआयडीच्या पदवीधर आहेत. एलिफंट डिझाईन या भारतातल्या सर्वात मोठ्या, स्वतंत्र आणि एकीकृत डिझाईन कन्सल्टन्सीच्या त्या सहसंस्थापक आहेत. भारत आणि सिंगापूर या देशांमध्ये त्यांची कार्यालयं आहेत. आॅटोमोबाईल, इंजिनिअरिंग, एफएमसीजी, फूड सर्विसेस, हेल्थ आणि पर्सनल केअरच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या डिझाईन्सनी अनेक जागतिक स्तरावरचे पुरस्कार मिळवले आहेत. अमेरिकेचा ग्लोबल रिब्रॅंड 100, सिंगापूरचा एशियास्टार फाॅर पॅकेजिंग एक्सलन्स, इटलीचा ए’डिझाईन अवाॅर्ड, द इंडिया स्टोरी अवाॅर्ड अशा काही प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांच्या कर्तबगारीवर मान्यतेची मोहोर उमटवली आहे. राॅकफेलर फाउंडेशनतर्फे डॅनिश डिझाईन फाउंडेशन यांनी कोपनहेगन कोक्रिएशन अजेंडा यांच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल सोशल इम्पॅक्ट समिटमध्ये विशेष निमंत्रित म्हणून त्यांनी सहभाग घेतला आहे. जगातल्या वीस देशांमध्ये डिझाईन क्षेत्रातील इंटरनॅशनल डिझाईन काॅंग्रेसमध्ये त्यांनी व्याख्यानं दिली आहेत. फ्रान्समधील कान्स लायन्स, अमेरिकेच्या ग्लोबल रिब्रॅंड 100, हाॅंगकाॅंगच्या स्पाईक्स एशिया अशा मोठ्या पुरस्कारांसाठी त्यांनी परिक्षक म्हणून ही काम पाहिलं आहे. जागतिक व्यापीठावर आपलं नाव गाजवणाऱ्या भारतीय महिला म्हणून #9women9days या कॅंपेनमध्ये त्यांना सहभागी करुन घेताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे.
मी कशासाठी ओळखली जाते?
डिझाईनर आणि भारतातील सर्वात मोठ्या डिझाईन कन्सल्टन्सी असलेल्या एलिफंट डिझाईन्सची सहसंस्थापक अशी माझी ओळख आहे.
प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ बाबत माझ्या ज्युनियर्सना माझा सल्ला
नवीन काहीही सुरु करण्यासाठी ‘आयडियल मोमेंट’ असा काहीही नसतो! त्यामुळे कुठलीही नवीन सुरवात करायची असेल तर वाट बघू नका, लगेच सुरु करा.
मी घेतलेला सगळ्यात अवघड निर्णय
छोट्या छोट्या जबाबदाऱ्या सहकाऱ्यांकडे सोपवणं हे सुरवातीच्या काळात माझ्यासाठी अवघड होतं पण एलिफंटच्या वाढीसाठी ते करणं अनिवार्य होतं. छोटी कामं सोपवण्यापासून मी सुरवात केली. प्राथमिक गरजा डिफाईन करण्यापासून ते सहकाऱ्यांने ते करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी पुरेसं स्वातंत्र्य देणं महत्वाचं होतं. ते मी शिकून घेतलं. पुढे जाऊन मोठे निर्णय, मोठ्या जबाबदाऱ्या, आर्थिक निर्णय घेणं, अशा पातळ्यांवर मी सक्षम सहकाऱ्यांना माझ्या कामात सहभागी करुन घेतलं. त्यातून टीम स्पिरिट निर्माण करणं शक्य झालं. ही कामं इतरांकडे सोपवण्यातून वाचवलेला वेळ मी ग्लोबल ट्रेंडस आणि प्रॅक्टिसेसचा अभ्यास करण्यासाठी वापरला. त्याचा आम्हाला कंपनी म्हणून मोठं होण्यासाठी उपयोगच झाला.
मी माझ्या पालकांकडून शिकले
आशावादी राहाणं आणि तरीही आपल्या मुळांशी जोडलं राहाणं.
कामाच्या ठिकाणी असलेलं सर्वात मोठं आव्हान
अॅपलसारखी जागतिक स्तरावर नावाजलेली कंपनी आपल्या वाढीमध्ये उत्तम डिझाईनचं श्रेय मोठं असल्याचं मान्य करते. भारतात मात्र डिझाईनिंगच्या क्षेत्राला तेवढं महत्व आजही दिलं जात नाही. त्यामुळे व्यवसाय क्षेत्र आणि व्यावसायिकांना डिझाईनिंगचं महत्व पटवून देणं हेच सगळ्यात मोठं आव्हान भारतात आहे. तुमच्या व्यवसायाचं महत्व पटवून द्यायचं असेल तर डिझाईनिंग मुळे मोठ्या झालेल्या तुमच्या ग्राहकांच्या यशोगाथा - सक्सेस स्टोरीज तुम्ही सांगायला हव्यात. त्यासाठी तुम्ही सतत - प्रामाणिकपणे आणि ग्राहकांची गरज, भावना समजून आणि ओळखून काम करायला हवं!
तुमच्या कोणत्या यशाचा तुम्हाला अभिमान आहे?
तीस वर्ष भारतात डिझाईन घेऊन येणाऱ्या ‘आद्य’ डिझाईनकर्त्यांमध्ये आमचा समावेश होतो. डिझाईनिंगच्या अनेक पैलूंचा अभ्यास करत एक मल्टीडिसिप्लिनरी कन्सल्टन्सी सुरु करणं ते जागतिक स्तरावर मान्यता मिळवणं हा प्रवास मोठा आहे. अशी कंपनी आम्ही उभी करु शकलो याचा मला आनंद आहे आणि माझ्या टीम बद्दल सार्थ अभिमान आहे!
Recent Comments