Rahi Sarnobat
Rahi Sarnobat created history at the Asian Games 2018 by winning GOLD medal in the 25m Pistol event, the first medal in the category by an Indian.
Rahi has bounced back after a serious elbow injury and what a glorious come back it has been!
Life of a sportsperson is geared towards single goal of winning and every preparation is done keeping in mind the final objective. To be at peak physical condition by way of training and spending hours in the gym, sacrificing family life and important social events, not being able to eat or drink as one pleases, foregoing holidays and maintaining steady training schedule day in and day out is an incredible way of living life. For a layperson and audience the behind the scene preparations and training –in-process for years is invisible.
It requires nerves of steel to compete at the highest level of competition.
We salute Rahi Sarnobat, an Arjun Awardee, number 1 ranked nationally in her category of pistol event and pride of India.
Wishing Rahi continued glory at the world level!
What is the best part about competing?
It is only in sports that one faces failures and successes at regular intervals and this is the way of life for any sportsperson. To rise from a failure and injury is ingrained in us and we are trained to be strong mentally and be in a positive state of mind. Life is all about balancing. Participating in a competitive sport prepares us to give our best at every juncture. It teaches us to be focused about achieving the ultimate goal of winning. Competing is a process behind which there is a lot of systematic preparation for years. A sportsman lives a difficult but enriched life.
My Role Model
Rahul Dravid! My inspiration and my role model. I have always liked watching and following cricket in all formats. I remember watching Rahul Dravid’s test cricket innings where he was batting on the ground for almost 2 days. The sheer stamina, patience and what graceful demeanor. That innings impacted me the longest. From there on I became a hard core fan of the great cricketer. He became my inspiration. The way he conducts himself with such great dignity. Mark of a true cricketer and a gentleman.
The best and worst decision…
Fortunately, I am not a reckless decision maker. I weigh the pros and cons and take my decisions thoughtfully. For example, one of the toughest decision for me was hiring a foreign coach to better my performance. It took me 2 years to take this step and of course monetary challenge of hiring a foreign coach is immense. I am spending almost Rupees sixty lakhs annually. Once I take a decision, I stick to it and make it work for me. I work hard to achieve my dreams and aspirations and am aware that I will need to be alert and careful while taking decisions. Like I said, the decisions that I have taken have ultimately turned out in the best interest for me.
What keeps me motivated…
I’ve never till date required to seek motivation to work towards my goals. That is innate part of me. I love this game and am passionate about my training. The entire process of preparing for a championship keeps me motivated and on a high. I have chosen this sport and I love my weapons and my ammunition. Every step in the journey of my training in itself is motivating. The sheer energy one gets in qualifying and participating at the highest level is something that cannot be described. I look forward to interacting with my peers globally. This sport is my life and this is my motivation.
In the end…
12 years of being in competitive sports, 2 years of forced rest due to injury and now upto 14 hours of training on daily basis and looking forward to each day to strive more and more is what my life is about. It is sports that has taught me lessons that have been invaluable and which nobody would have been able to impart to me. To be tough mentally and think things through and work it out to get best results is what every sportsperson does. It teaches you to be ‘selfless’ and how to tackle life. 2 years of being from the sport due to injury was the hardest time. The surgery, rehab, training and finally achieving success again has been a process where I have always believed in myself and not once did I loose hope. This has been possible because my love for this sport is what keeps gives me a high for life. So if you do what you love and if it is your passion than nothing can stop you to achieve success on your own terms. Be yourself and enjoy every process of your chosen work and see the magical results and happiness it will give you.
राही सरनोबत
२०१८ च्या एशियन गेम्समध्ये २५ मीटर पिस्टल शूटींग प्रकारात सूवर्णपदक मिळवून राही सरनोबतनं इतिहास रचला आणि या क्रीडाप्रकारात सुवर्ण पदक मिळवणारी ती पहिली भारतीय ठरली. राहीनं मिळवलेलं हे यश खास आहे कारण एका गंभीर एल्बो इंज्युरीवर म्हणजेच कोपराच्या दुखापतीवर मात करुन तिनं एशियन गेम्समध्ये सहभाग घेतला होता. एका खेळाडूच्या आयुष्यात ‘जिंकणं’ या एकमेव ध्येयाच्या दिशेने प्रत्येक पाऊल टाकलं जातं. राही सुद्धा याला अपवाद नाही. खडतर प्रशिक्षण घेणं, जिममध्ये घाम गाळणं, खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी बाजूला ठेवणं ते अगदी घरगुती सणसमारंभ, गेटटूगेदर्सला जायला न मिळणं अशा अनेक तडजोडी करत केवळ सरावावर लक्ष केंद्रीत करणं हे राहीनं आजवर अनेकदा केलंय. राहीची मॅच बघताना एक सामान्य क्रीडा रसिक म्हणून या तडजोडींची आपण कल्पना ही केलेली नसते मात्र असं यश मिळवायला आणि टिकवायला भक्कम निर्धारच आवश्यक असतो. अर्जुन पुरस्कार विजेती महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय ख्यातीची नेमबाज राही ही आपल्या #9women9days कॅंपेनमधली पुढची मानकरी आहे.
तुझ्या मते स्पर्धा म्हणजे काय?
खेळ ही एकमेव जागा अशी आहे, जिथे ठराविक इंटरवल्सनंतर यश आणि अपयशाला आपण सामोरे जातो. खेळाडूच्या आयुष्याचा तो अपरिहार्य भाग असतो. एखाद्या अपयशानंतर किंवा दुखापतीतून उठून पुन्हा कामाला लागणं हे खेळाडूंच्या रक्तात भिनलेलं असतं, ते मानसिक कणखरपण आमच्यात यावं यासाठी आम्हाला प्रशिक्षण ही तसंच दिलं जातं. क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यामुळे प्रत्येक वेळी आपला बेस्ट परफार्मन्स द्यायचाय याची सवय लागते. त्यामुळे फोकस अजिबात हलू न देणं हे आमचं उद्दीष्ट असतं! स्पर्धेसाठी स्वत:ला तयार करणं ही वर्षानुवर्षांची, आखीवरेखीव तयारी असते. खेळाडू खडतर आयुष्य जगतात हे खरं, पण ते समृद्ध करणारं असतं हे त्याहून खरं आह!
तुझा आदर्श?
राहुल द्रविड! तो माझा आदर्श ही आहे आणि प्रेरणासुद्धा! वन डे असो की कसोटी, मला सगळ्या प्रकारचं क्रिकेट पहायला आवडतं. कसोटी क्रिकेट मध्ये राहुल द्रविड दोन दोन दिवसाच्या इनिंग्ज खेळायचा. त्याची उर्जा, त्याचा पेशन्स आणि त्याची एकूण सभ्य वर्तणुक मला कमाल वाटते. त्या इनिंग्ज नंतर मी त्याची ‘फॅन’ झाले. क्रिकेटर म्हणून, माणूस म्हणून त्याची उत्तम जडणघडण ही त्याच्या व्यक्तीमत्वाची वैशिष्ट्य आहेत. म्हणूनच तो उत्तम स्पोर्ट्समन आणि जेंटलमन ही आहे.
तू घेतलेला सर्वोत्तम निर्णय कोणता?
माझ्या सुदैवानं मी फारशी बेफिकीरपणे निर्णय घेऊन मोकळी होणारी व्यक्ती नाही. एखादा निर्णय घेताना त्याचे चांगले वाईट परिणाम काय होतील याचा विचार करुन मगच मी निर्णय घेते. उदाहरणच द्यायचं झालं तर माझ्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी परदेशी प्रशिक्षक नेमण्याचा निर्णय. हा निर्णय घ्यायला मला २ वर्ष लागली. अर्थात परदेशी प्रशिक्षक नेमायचा असेल तर त्यासाठी करावी लागणारी आर्थिक तरतूद हे ही आव्हान असतंच. वर्षाला साठ लाख रुपये खर्च करुन मी परदेशी प्रशिक्षकांचं मार्गदर्शन घ्यायला सुरवात केली. एकदा निर्णय घेतला की तो तडीस नेणं हा माझा स्वभाव आहे, त्यामुळे त्याचे उत्तम रिझल्ट्स मिळवण्यासाठी मी मेहनत करते. त्यामुळे मी घेतलेले सगळे निर्णय माझ्यासाठी योग्य ठरतात.
तू मोटिवेशन कशातून घेतेस?
माझ्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मला कधीही मोटिवेशन शोधावं लागलं नाही, ते माझ्यात जन्मजात आहे. मला नेमबाजी मनापासून आवडते, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या मेहनतीतून मोटिवेशन मिळतंच. मला माझी वेपन्स आवडतात. स्पर्धेसाठी करायला लागणारी तयारी आवडते. एखाद्या स्पर्धेसाठी क्वालिफाय होणं, त्यानंतर सहभाग घेता येणं ही अतीव समाधान देणारी गोष्ट असते. नेमबाजीचा खेळ हेच माझं आयुष्य आहे आणि मोटिवेशन सुद्धा!
नवीन खेळाडूंना, तरुणांना तुझा सल्ला
१२ वर्ष स्पर्धात्मक खेळात असणं, दुखापतीमुळे २ वर्ष सक्तीची विश्रांती घ्यावी लागणं आणि त्यानंतर आता परत दिवसाला चौदा चौदा तास सराव करणं हा माझा प्रवास आहे. या खेळातून मी जे शिकले आहे ते इतर कशातूनही मी शिकू शकले नसते. खेळासाठी स्वत:ला भावनिक, शारिरीक दृष्ट्या कणखर बनवणं, उत्तम रिझल्ट मिळवण्यासाठी मेहनत करणं हे खेळाडूला करावंच लागतं. खेळ व्यक्तीला ‘सेल्फलेस’ व्हायला शिकवतो. दुखापतीमुळे २ वर्ष नेमबाजी पासून लांब राहाणं हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात खडतर काळ होता. त्यामुळे पुन्हा खेळायला सुरवात करुन एशियन गेम्समध्ये पदक जिंकणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. नवीन खेळाडूंना, खेळाडूंनाच नव्हे तर कुठलंही करिअर निवडणाऱ्या मुला-मुलींना मला हेच सांगायचंय - तुम्हाला जो खेळ किंवा जे करिअर आवडतं ते निवडा. ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जी मेहनत करावी लागते ती एकदा का तुम्हाला आवडायला लागली की तुम्हाला ‘रिझल्ट्स’ मिळतील. त्यातून मिळणारं समाधान आणि आनंद लाखमोलाचं असेल.
Recent Comments