Sulajja Firodia Motwani
Vice Chairperson, Kinetic Engineering
Founder & CEO, Kinetic Green Energy & Power Solutions Limited
Alright now, the lady is a super achiever. How else can you describe a woman who has been elected by the World Economic Forum as a “Young Global Leader“, was featured as a business “Face of the Millennium” by leading magazine India Today; and was voted among the top 25 business leaders of the next century in a poll of industrialists conducted by Fortune India. Sulajja has received the Society Young Achiever’s Award for Business, Young Super Achiever Award by Business Today, and MTV’s style icon award, “India's Most Powerful Women award” and Top Management Consortium Award of Excellence, among others.
Sulajja holds an MBA from the prestigious Carnegie Mellon University, Pennsylvania, USA. She has also served on the Board of Trustees of the University and was invited on the President’s Committee for India for several years.
Hold on, it does not end. She is a fitness enthusiast and a marathon runner. Her interests also include adventure sports such as skiing, scuba, mountain biking and sky diving.
We are so proud of you Sulajja.
Incredibly proud & honoured to have you for #9women9days.
सुलज्जा फिरोदिया मोटवानी
कायनेटिक इंजिनिअरिंगच्या व्हाईस चेअरपर्सन,
कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्यूशन्स लिमिटेडच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशी सुलज्जा फिरोदिया मोटवानी यांची भारदस्त कारकीर्द आहे.
वर्ल्ड इकाॅनाॅमिक फोरमने यंग ग्लोबल लीडर म्हणून गौरवलेल्या, इंडिया टुडे सारख्या मासिकाने सहस्त्रकाचा चेहरा म्हणून सन्मानित केलेल्या आणि फाॅर्च्यून इंडियाकडून घेण्यात आलेल्या जनमत चाचणीतून शतकातल्या टाॅप २५ उद्योजकांपैकी एक म्हणून निवडल्या गेलेल्या सुलज्जा फिरोदिया मोटवानी यांच्या यशाचा आलेख नेहमी चढताच राहिलाय. सोसायटी यंग अचिव्हर पुरस्कार, बिझनेस टुडेचा यंग सूपर अचिव्हर पुरस्कार, एमटीव्ही स्टाईल आयकाॅनचा ‘भारतातील सर्वात प्रबळ महिला’ पुरस्कार असे एकापेक्षा एक सन्मान नावावर आहेत... म्हणूनच सुलज्जा ‘सुपर अचिव्हर’ हे बिरुद शब्दश: सार्थ ठरवतात!
सुलज्जा यांनी अमेरिकेतल्या सर्वात प्रतिष्ठित कार्नेजी मेलाॅन युनिवर्सिटी पेनसिल्वानिया मधूम एमबीए केलंय. सुलज्जा यांनी या विद्यापीठाच्या विश्वस्त मंडळाच्या पदाधिकारी म्हणून काम पाहिलं आहे आणि अनेक वर्ष राष्ट्राध्यक्षांच्या कमिटीवर भारताच्या प्रतिनिधी म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे.
थांबा, त्यांच्या यशाचा परीघ व्यावसायिक कर्तबगारीपाशीच संपत नाही. सुलज्जा कमालीच्या फिटनेस फ्रीक आहेत. त्या मॅरेथाॅनपटू आहेत. स्किईंग, स्कूबा डायव्हिंग, गिर्यारोहण, स्काय डायव्हिंग या त्यांच्या विशेष आवडीच्या गोष्टी आहेत. थोडक्यात, त्या ऑलराऊंडर आहेत!
सुलज्जा, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो!
#9women9days कॅंपेनमध्ये तुमचा सहभाग हा एका अर्थानं आम्ही आमचाच सन्मान समजतो!
Recent Comments