I have been fortunate to be surrounded by strong independent women through out my career. Whether it be assisting Sumitra Bhave or sharing stage with Radhika Apte. But the biggest assets that I ever earned was getting Paula McGlynn as partner. The biggest lesson I have learned working with her is ‘when a women decide to take charge they don’t look back.' Their determination is like an unshakable fortress . ‘ Paula is not just founder of bhadipa, she is the one who have kept the ship a float. She anchor us when the currents are strong and sail us when the winds are good.' - Sarang Sathaye
Paula McGlynn
What am I known for (Innovator, Taskmaster, Administrator, Multitasker)
Depending on how you know me, you may see me differently. Sarang and some others in the office say I scare people because I am very direct in the way I speak, and it comes off as being strict. However, thankfully those who know me for a while longer tend to learn that I’m absolutely open to feedback and don’t believe in the hierarchical systems that a boss has to be obeyed without question. I can be wrong and I am not afraid to apologise either. That being said, in business I’m definitely a taskmaster- I became like this because I have a habit of taking on so many things that I lose track, hence my Calendar and to-do lists are as important to my survival as food & water!
Leadership is a private journey of hard decisions. Your take about this
A couple years ago I would have flat-out rejected this idea because I’ve been so lucky to have Anusha and Sarang as my partners. While they bestowed the title of CEO on me, most of our major decisions are taken jointly with plenty of inputs from them. That being said, I’ve learned that as your company grows in size the leadership eventually does need to keep some separation from the rest of the team when it comes to important operational and business decisions. Your team need not know every burden and struggle you’re facing, and you need not burden yourself with explaining everything to them if it’s not relevant. Hence, now I would agree that to some level leadership has its hardships, and it can often feel very thankless. However, if you’re lucky it doesn’t have to be lonely.
Pandemic made you Unlearn…
Constantly working throughout this pandemic on top of dealing with the various emotionally draining and sad events that took place resulted in me going through a burn-out earlier this year. I never thought I would be the person to seek therapy but I eventually took help and learned through that process that I have higher expectations of myself than I do for other people. Remembering to be kind to yourself and set boundaries is an important skill I’m trying to learn as I move forward with a goal of finding more balance in work and life.
What drives you?
Whatever I do, it’s because I want to make stuff! I want to tell stories, explore new perspectives and voices, and support others in their projects as well. I studied filmmaking and that’s where my passion lies, but I got into business purely because I wanted us to have the power to invest in our own work and in the work of others we believe in. The more power we can take into our hands as creators, the better it is for us! There is a lot more work and responsibility involved but I think the creative freedom that comes with it is worthwhile.
An accomplishment you are proud of
I still can’t quite believe we shot 4 web series during a pandemic- 2 YouTube shows and 2 OTT platform shows, out of which 3 have released. I’m so proud of Shantit Kranti and how it’s performed thanks to the great marketing by Sony Liv. All of that aside, I’m most proud of the amazing community of fans, creators, and technicians who have joined the “Party” over the last 5 years. I am sometimes overwhelmed by the love we get, and often doubt if we’re worthy of it. We would be nothing without our community, so that’s what I’m most proud of.
माझ्या सगळ्या करिअरमध्ये स्वतंत्र आणि कर्तबगार महिला, मुलींबरोबर काम करायची संधी मला सातत्याने मिळाली आहे. मग ते सुमित्रा भावे यांच्या बरोबर सहायक म्हणून केलेलं काम असो की राधिका आपटे बरोबर केलेला अभिनय... पण पॉला माझी 'बिझनेस पार्टनर्' असणं हे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तिच्याबरोबर काम करताना मी एक अगदी पक्कं शिकलोय - एखादी महिला, मुलगी, स्त्री एखाद्या कामाचा 'चार्ज' घेते तेव्हा ती मागे वळून बघत नाही. त्यांचा निश्चय एखाद्या किल्ल्याच्या तटबंदीसारखा अढळ असतो. पॉला ही भाडिपाची केवळ 'फाउंडर' नाही तर थोडक्यात आणि नेमकं सांगायचं म्हणजे आमच्या 'शिप'ची 'कॅप्टन' आहे. आमच्या चांगल्या काळात तर तिचा भक्कम पाठींबा कायमच असतो पण कठीण काळात आम्ही भरकटू नये, याची पुरेपूर काळजी ती घेते. - सारंग साठे
पॉला मॅग्लिन
मी कशासाठी ओळखली जाते?
मला ओळखणारे कसे आणि किती ओळखतात यावर मी कशासाठी ओळखली जाते हे ठरणार. सारंग आणि माझे काही सहकारी म्हणतात माझ्या शिस्तीच्या आग्रहामुळे, थेट बोलण्यामुळे मी सगळ्यांना घाबरवते. पण एक नक्की, जे मला काही काळापासून ओळखतात त्यांना हे नक्की माहिती आहे की मी काम करताना - हायरारकी - वरिष्ठ-कनिष्ठ ही दरी मानत नाही. ‘बॉस’ या व्यक्तीच्या आज्ञा पाळल्या गेल्याच पाहिजेत असं मानणाऱयांपैकी मी नाही. उलट ‘फीडबॅक’ बाबत मी सदैव औत्सुक्य राखुन असते. माझा निर्णय चुकणं शक्य आहे, त्यासाठी ‘सॉरी’ म्हणण्यात मला काहीच गैर वाटत नाही. अर्थात असं असलं तरी ‘बिझनेस’ करायचा तर कामाबाबत आग्रही आणि काटेकोर राहायलाच हवं, या मताची मी आहे. याचं कारण असं की मला एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची सवय आहे. त्यामुळे काही विसरायला नको म्हणून माझं वेळापत्रक आणि ‘टू डू लिस्ट’ नेहमी तयार असते. खाण्यापिण्याइतकीच ती माझ्यासाठी जीवनावश्यक गोष्ट आहे.
नेतृत्व करताना कठोर निर्णय घेणं अपरिहार्य आहे, तुझं काय मत आहे?
अनुषा आणि सारंग माझे सहकारी असताना मी ‘सीईओ’ असले तरी कोणतेही निर्णय आम्ही तिघांनी भरपूर चर्चा करुन एकत्रितपणे घेतलेले असत. काम वाढतं तेव्हा सीईओ किंवा अधिकारी पदावरील व्यक्तीला इतरांपासून वेगळा विचार करुन काही निर्णय स्वत:चे स्वत: घेणं आवश्यक ठरतं. अधिकारी पदावरील व्यक्तीची प्रत्येक अडचण, चॅलेंज हे हाताखालील लोकांना समजलंच पाहिजे असं नाही. त्यांना सगळं सांगण्याचं दडपणही अधिकारी पदावरच्या व्यक्तीवर असता कामा नये. त्यामुळे आता, इतक्या वर्षांनंतर मी हे मान्य करते की नेतृत्व करताना कठोर निर्णय घेणं भाग पडतं, पण एक नक्की तुम्ही ‘लकी’ असाल तर अशा गोष्टी तुम्हाला एकट्याला ‘फेस’ कराव्या लागणार नाहीत.
पँडेमिकमुळे काय विसरावं लागलं?
पँडेमिकच्या काळात काही खरोखरच अवघड प्रसंगांवर मात करत काम करत राहणं मला व्यक्तिश: फार दमवणारं होतं. मी ‘थेरपी’ सारखी मदत घेईन असं मला कधीही वाटलं नव्हतं. पण अखेर मी ‘थेरपी’ घ्यायचं ठरवलं. त्यावेळी मला जाणवलं माझ्या इतरांकडून असतात त्यापेक्षा स्वत:कडून अपेक्षा जास्त आहेत. स्वत:ची काळजी करणं, स्वत:बाबत थोडा सहानुभूतीने विचार करणं – बीईंग काईंड टू सेल्फ - यात काहीही गैर नाही हे मी नव्याने शिकले. ‘वर्क लाईफ बॅलन्स’ साधायचा धडा मला यातूनच मिळाला.
चालत राहण्याची प्रेरणा कशातून मिळते?
मी जे काही करते ते मला करावंसं वाटतं म्हणून करते. मला गोष्टी सांगायला आवडतात. नव्या गोष्टींवर काम करायला, इतरांच्या कामात सहभाग घ्यायला आवडतं. ‘फिल्ममेकिंग’ मी शिकले आहे. तेच माझं ‘पॅशन’ आहे. पण मी ‘बिझनेस’ मध्ये आले कारण चांगल्या कामात गुंतवणुक करण्यासाठी आपण सक्षम असायला हवं असं मला वाटतं. ‘क्रिएटर’ म्हणून आपण जेवढे सक्षम होऊ, तितकं चांगलं असं मी मानते. त्यात काम आणि जबाबदारी भरपूर आहे, पण त्यातून मिळणारं स्वातंत्र्य आणि समाधान लाखमोलाचं आहे.
तुला अभिमान वाटतो, अशी एखादी गोष्ट?
पँडेमिक सारख्या अवघड काळात आम्ही चार वेब सिरिज केल्या यावर आजही कधी कधी माझा विश्वास बसत नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी दोन आणि युट्यूबसाठी दोन असे चार शोज आम्ही केले. त्यापैकी तीन शोज रिलिज झाले. 'सोनी लिव्ह' च्या मार्केटिंग टीम आणि 'शांतीत क्रांती' च्या टीमचं मला खुप कौतुक वाटतं. त्या सगळ्यांच्या बरोबरीने फॅन्स, क्रिएटर्स, टेक्निशियन्स, प्रेक्षकांचं प्रेम मला 'ओव्हरव्हेल्म' करतं, आणि मग आमच्या कामाबद्दलचा माझा अभिमान वाढतो.
Recent Comments