Smita Kulkarni is one of the famous and popular faces of running in Pune and India.She is known in the running community for her style, her elegance, her confidence and of course her running speed as well. Often times people come up to Smita and ask her if she is in her 30s and it’s funny to see their reaction when she discloses her young age of 49. Smita started running marathons at the age of 42 and has already run 9 full marathons including World Majors like the Berlin and Chicago Marathon and over more than 25 half marathons . She has been a regular podium finisher in her age category including the tough and popular Satara Hill Marathon.
Smita runs a successful professional baking business and once you have any of her cakes and desserts you will be Smitten just like her brand name. She is also an excellent cook and I am one of the lucky one to taste quite a few of her dishes. A prime aspect of Smita’s fitness is her strength training routine, she says she is a gymmie first and a runner later. Smita is one of my first trainees at Radstrong and one of the most consistent and dedicated ones.
- Kaustubh Radkar
Smita Kulkarni
What am I known for?
I consider myself to be a multitasker. Sometimes in a span of a few hours I have finished my morning Run, Gym Workout, Baking Orders, planned meals and cooked for my family with no help, taken my dog for a walk and still put time aside to watch Netflix with the family before retiring to bed.
Pandemic made you unlearn...
Before the Pandemic hit I had a lot planned in terms on my marathon training and travel but I had to adjust to the new situation, reassess my priorities and revalue my goals and I am proud to say that I did that with the help of my Coach. I am still achieving my goals but I approach them differently. I have learnt to live the new normal.
The most important Mentor/ Influencers in your life. What did they teach you?
My Father was my first Mentor, he taught me the value of fitness, exercise and first and foremost how to be a good human being. My coach Kaustubh is a fantastic motivator and I have learnt a lot from him especially how discipline, consistency and hard work help you achieve your goals.
What advice would you give your younger self?
Though I have always been into fitness I started a disciplined fitness regime after I started training for marathons in my early 40s. Though I have enjoyed every phase of my life, I would tell the younger me to get my act together as a teenager.
What drives you?
I guess I am self-driven, I push myself hard and relentlessly but positive strokes from my Husband, Son and Running Buddies raise my confidence levels.
An accomplishment you are proud of?
A major accomplishment for me has been that my 18 year old son has over the last year become a great Fitness Freak .During the Pandemic he learnt the value of exercise and fitness and today he is an Enthusiastic Gym Rat! and in fact teaches me new things about Fitness and Forms.
रनिंगच्या वर्तुळात स्मिता कुलकर्णी हे नाव परिचित आणि प्रसिद्ध आहे. तिचा आत्मविश्वास, शैली आणि धावण्याचा वेग यासाठी ती पुण्यासह संपूर्ण भारतभरात ओळखली जाते. फिटनेसची अत्यंत आवड, त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी आणि सातत्य यांमुळे सगळ्यांना ती तिशीतली वाटते. तिचं खरं वय ती सांगते तेव्हा ऐकणारे फक्त थक्क होतात. कारण ती तिशीतली नाही, फक्त ४९ वर्षांची आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी तिने मॅरेथॉन धावायला सुरुवात केली, आणि आतापर्यंत ९ फुल मॅरेथॉन धावून पूर्ण केल्या आहेत, त्यांमध्ये जागतिक स्तरावरच्या बर्लिन आणि शिकागो मॅरेथॉन्सचाही समावेश आहे. या बरोबरच आणि २५ पेक्षा जास्त हाफ मॅरेथॉन सुद्धा पूर्ण केल्या आहेत. सातारा हिल मॅरेथॉनसारख्या अत्यंत अवघड मॅरेथॉन्स मध्येही ती तिच्या वयोगटामध्ये 'पोडियम फिनिशर' असतेच.
स्मिता तिचा बेकिंग बिझनेसही जीव ओतून करते. तिने बेक केलेले केक्स, डेझर्ट्स हे तिचा ब्रँड "स्मिटन" या नावाला साजेसे असतातच. खरं तर तिच्या हातचे सगळेच पदार्थ अप्रतिम असतात. तिने तयार केलेल्या बऱ्याचशा पदार्थांची मी चव घेतली आहे, त्यामुळे मी हे खात्रीपूर्वक सांगू शकतो. जिम मध्ये नियमित गाळला जाणारा घाम हे स्मिताच्या फिटनेसचं सिक्रेट आहे. स्मिता म्हणते, जिम हे माझं पहिलं प्रेम आहे, नंतर रनिंग! 'रॅडस्ट्राॅंग' मध्ये स्मिता माझी पहिली विद्यार्थिनी आहे. तिच्यात असलेलं सातत्य आणि चिकाटी या गोष्टी सगळ्यांनीच तिच्याकडून शिकण्यासारख्या आहेत.
- कौस्तुभ राडकर.
स्मिता कुलकर्णी
मी कशासाठी ओळखली जाते?
मी स्वत:ला मल्टीटास्कर मानते. कधीतरी सकाळच्या अवघ्या काही तासांमध्ये माझं धावणं, जिम वर्कआऊट, बेकिंगच्या ऑर्डर पूर्ण करणं, घरी जेवणाचा मेनू ठरवणं आणि मदतीशिवाय सगळा स्वयंपाक करणं, माझ्या कुत्र्याला फिरवून आणणं इतक्या गोष्टी करुन झालेल्या असतात. शिवाय, एखादी डुलकी काढण्याआधी नेटफ्लिक्स पहायलाही माझ्याकडे निवांत वेळ असतो. त्यामुळे, येस, मी मल्टीटास्कर आहे.
पॅंडेमिकने काय विसरायला लावलं?
पॅंडेमिक येण्यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार माझं मॅरेथॉन आणि प्रवास असं बरंच नियोजन होतं. पण शेवटी नव्या बदलाशी जुळवून घ्यावं लागलं. नव्यानं माझे प्राधान्यक्रम ठरवुन त्याप्रमाणे निर्णय घ्यावे लागले. माझ्या कोचच्या मार्गदर्शनाखाली मी हे बदल केले. आता नव्या दृष्टीकोनातून मी गोष्टींकडे पाहते. थोडक्यात सर्वच दृष्टींनी न्यू नॉर्मल मी स्विकारलंय.
माझे मार्गदर्शक, सल्लागार?
माझे वडिल हे माझे पहिले मार्गदर्शक, गुरु. फिटनेस, व्यायाम या गोष्टींची गोडी लावतानाच चांगली माणुस होण्याचे संस्कार त्यांनी माझ्यावर केले. माझा कोच कौस्तुभही माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. शिस्त, सातत्य आणि मेहनत यांच्या बळावर आपलं ध्येय साध्य करणं मी त्याच्याकडून शिकते.
चालत राहण्याची प्रेरणा कशातून मिळते?
स्वयंप्रेरणा माझ्यासाठी खुप महत्त्वाची आहे. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर स्वत:च्या प्रगतीचा आलेख उंचावणं मला आवडतं. त्याचबरोबर नवरा, मुलगा आणि मॅरेथॉनमधले माझे सह-धावपटू यांच्या सकारात्मक पाठिंब्यामुळेही प्रेरणा मिळतेच.
काही वर्षांपूर्वीची तू तुला भेटलीस तर तिला काय सल्ला देशिल?
मी नेहमीच फिटनेस बद्द्ल सजग आणि आग्रही राहिलेय. पण मी माझ्या वयाच्या चाळीशीत मॅरेथॉन धावायला सुरुवात केली तेव्हा फिटनेसबाबत मला आणखी शिस्त आली. काही वर्षांपूर्वीची मी मला भेटले तर फिटनेसबाबत सजग आणि आग्रही राहण्याबरोबरच त्याकडे थोडं अधिक शिस्तीने पहाण्याचा सल्ला मी देईन.
तुला अभिमान वाटतो अशी एखादी गोष्ट?
मागच्या वर्षभरामध्ये माझ्या १८ वर्षांच्या मुलाला फिटनेसची लागलेली गोडी ही माझ्यासाठी विशेष अभिमानाची गोष्ट आहे. पॅंडेमिकच्या काळात त्याला व्यायामाचं महत्त्व जाणवलं आणि तो फिटनेसबद्दल काहीसा सजग झाला. आता त्याला जिम मनापासून आवडते. नव्या गोष्टी त्याच्याकडून मी शिकते. मला या गोष्टीचा खुप अभिमान वाटतो.
Recent Comments