प्रसंग – 1 दोन दिवसांपूर्वी एका ठिकाणी जात असताना एक सहाय्यक दिग्दर्शक भेटला, त्यावेळी तो सांगत होता की सध्या तो सॅनिटायझर स्टँड, मास्क, अर्सेनिक अल्बमया होमिओपॅथीच्या गोळ्या विकतोय. बोलत असताना माझे कान बंद झाले आणि मी त्याच्या हावभावाकडे बघत राहिलो,माझ्या लक्षात आलं की, हा एखाद्या निर्मात्याला, चित्रपटाच्या सेटवर नटाला स्क्रिप्ट समजावून सांगत असेल त्याच आत्मियतेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क,सॅनिटायझर आणि गोळ्यांचे महत्त्व मला समजावून सांगत आहे. Cut to प्रसंग – 2 काही चित्रपट,मालिकांमध्ये काम केलेला एक अभिनेता मुंबईत सुके मासे विकतोय, त्याला ग्राहक आणि इंडस्ट्रीतल्या लोकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय. Cut to प्रसंग – 3 मुंबईतील एक गुणी अभिनेता लॉकडाऊन काळात आंबे विक्री करत होता. ठाण्यात एक अत्यंत कुशल अभिनेता रमेश चांदणे रिक्षा चालवतो (अर्थात लॉकडाउनच्या आधीपासून) फिल्म इंडस्ट्री, मीडिया मधील मलामाहीत असलेले आणि नसलेले अनेकजण आज जोडधंदा, नोकरी, व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत किंवा भविष्यात करतील. जोडधंदा करण्यात काहीच वावगे नाही, मी आणि माझे सहकारी अशी आमची टीमही या फावल्या वेळेत पुण्यात सॅनिटायझर विक्री करत आहोत. खरं तर हा ब्लॉग लिहिताना कोरोना, लॉकडाऊन या विषयावर लिहायचे नाही असे मनात गृहीत धरून मी लिहायला बसलो, पण बघा ना कोरोना आणि लॉकडाऊन या विषयाने आपल्या विचारांनाही काहीसे लॉक केले आहे. आपण कोणाशीही, कुठेही बोलायला सुरुवात केली की तिसर्या वाक्यात आपण कोरोनावर आलोच म्हणून समजा. […]
Read More
Recent Comments