LogoLogo
  • Home
  • About
  • Services
  • Portfolio
  • Gallery
  • 18of18
  • Blog
  • Contact

साईड बिझनेस! उसमे क्या है?  

Lead Media · June 24, 2020 · Vinod Satav · 5 comments · 7656 Views
2

प्रसंग – 1

दोन दिवसांपूर्वी एका ठिकाणी जात असताना एक सहाय्यक दिग्दर्शक भेटला, त्यावेळी तो सांगत होता की सध्या तो सॅनिटायझर स्टँड, मास्क, अर्सेनिक अल्बमया होमिओपॅथीच्या गोळ्या विकतोय. बोलत असताना माझे कान बंद झाले आणि मी त्याच्या हावभावाकडे बघत राहिलो,माझ्या लक्षात आलं की, हा एखाद्या निर्मात्याला, चित्रपटाच्या सेटवर नटाला स्क्रिप्ट समजावून सांगत असेल त्याच आत्मियतेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क,सॅनिटायझर आणि गोळ्यांचे महत्त्व मला समजावून सांगत आहे.

Cut to

प्रसंग – 2

काही चित्रपट,मालिकांमध्ये काम केलेला एक अभिनेता मुंबईत सुके मासे विकतोय, त्याला ग्राहक आणि इंडस्ट्रीतल्या लोकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय.

Cut to

प्रसंग – 3

मुंबईतील एक गुणी अभिनेता लॉकडाऊन काळात आंबे विक्री करत होता. ठाण्यात एक अत्यंत कुशल अभिनेता रमेश चांदणे रिक्षा चालवतो (अर्थात लॉकडाउनच्या आधीपासून)

फिल्म इंडस्ट्री, मीडिया मधील मलामाहीत असलेले आणि नसलेले अनेकजण आज जोडधंदा, नोकरी, व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत किंवा भविष्यात करतील. जोडधंदा करण्यात काहीच वावगे नाही, मी आणि माझे सहकारी अशी आमची टीमही या फावल्या वेळेत पुण्यात सॅनिटायझर विक्री करत आहोत.

खरं तर हा ब्लॉग लिहिताना कोरोना, लॉकडाऊन या विषयावर लिहायचे नाही असे मनात गृहीत धरून मी लिहायला बसलो, पण बघा ना कोरोना आणि लॉकडाऊन या विषयाने आपल्या विचारांनाही काहीसे लॉक केले आहे. आपण कोणाशीही, कुठेही बोलायला सुरुवात केली की तिसर्‍या वाक्यात आपण कोरोनावर आलोच म्हणून समजा.

बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि त्या प्रमाणेच आज आपली वाटचाल सुरू आहे. मागील 3 महिन्यात म्हणजे लॉकडाउन सुरू झाल्यापासून आपण दररोज नवनवीन प्रयोग होताना बघत आहोत किंबहुना आपण त्याचा भाग बनलो आहोत. फेसबुक किंवा इंस्टाग्राम लाईव्ह, ओटीटी  प्लॅटफॉर्मवरच्या वेबसिरीज, झुम मीटिंग असो की वेबिनार,अशा अनेक बदलांना आपण स्वीकारले आहे. असे असले तरीही आगामी काळातील परिस्थितीचा नेमका अंदाज येत नसल्यामुळे भविष्याची अनिश्चितता आता प्रत्येकाच्या हालचालीतून स्पष्ट दिसत आहे.

खरं तर या काळात कुणाच्या हातून काय निसटून गेले याची मला चर्चा करायची नाही, पण माझा मित्र आणि लेखक क्षितिज पटवर्धन याने लिहिलेली फेसबुक पोस्ट मला खूप बोलकी आणि सकारात्मक वाटली.क्षितिजने लिहिले आहे की,‘’आज पेपरात काही कलाकारांनी चरितार्थासाठी छोटे उद्योग सुरु केल्याचं कळलं. श्रमाला न लाजणाऱ्या तुम्हा सर्वांना माझा सलाम आहे. लवकरच हे सारं सुरळीत होवो आणि तुम्हाला भरभरून काम मिळो!’’

लॉकडाऊन पूर्वीचे काही फोन कट्स आठवून बघा

1 – अरे मी मिटिंगला वेळेवर येऊ शकत नाही, ट्रेनला जाम गर्दी आहे.

2 –आजची मीटिंग कॅन्सल करुयात कसला कुत्र्यासारखा पाऊस पडतोय

3 – अरे तिची (बायकोची) 7 ते 7 ची शिफ्ट लागलीय, मला घरी थांबावं लागेल, आपल वाचन उद्या ठेऊयात का?

4 – अरे मुंबईला निघालो होतो पण एक्सप्रेस वे ला कसला राडा आहे ट्रॅफिकचा, मी टोल नाक्यावरून पुण्याला परत निघालोय.

5 – आपण भेटणार होतो पण आज नेमकं निर्माते आमच्या स्टुडिओत आले आहेत आपण उद्या भेटूयात का?

6 –वेस्टर्न एक्सप्रेस हायवे सॉलिड जाम आहे मला टाउनमध्ये पोहोचायला किमान 2 तास तरी लागतील.

7– ऑडिशन तिथे येऊनच द्यावी लागेल का? कारण माझा दिग्दर्शक मला सेटवरून सोडतच नाहीए

पूर्वी अशा अनेक कारणांमुळे प्रोजेक्टच्या कामाला स्वल्पविराम लागत होता. सध्या कोरोना, लॉकडाउनमुळे आपल्या आयुष्याला स्वल्पविराम लागलाय. आता आपल्या आयुष्याचा नवीन रकाना, पॅरेग्राफ सुरू झाला आहे. बदल हा नैसर्गिक असतो. या काळात आपण अनेक गोष्टी नव्याने स्वीकारल्या आहेत, भविष्यात आणखी काही बदल आपण स्वीकारलेले असतील.

लॉकडाउनच्या काळात ‘रामायण’,‘महाभारत’ सारख्या जुन्या मालिकांचे रिपीट टेलिकास्ट सुरू झाले, नंतर सोनी मराठी वाहिनीवर इंडियन मॅजिक आय ने ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ ही मालिका आणली, झी मराठीवर आदेश बांदेकर ‘होम मिनिस्टर’ नव्या स्वरुपात घेऊन आले, वैभव मांगले ‘एक गाव भुताचा’ घेऊन आलाय शिवाय ‘टोटल हुबलाक’ ही मालिका सुद्धा सुरू झाली. स्टार प्रवाह वाहिनीनेही मालिकांचे नवीन भाग लवकरच दिसतील अशी घोषणा केली आहे. ‘गुलाबो सीताबो’ सारखे बहुचर्चित चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. याशिवाय वेबसिरीजच्या माध्यमातूनही ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारचा कंटेट पाहायला मिळत आहे. तसेच मध्यंतरी काही वेबसिरीज टीव्हीच्या स्क्रीनवरही दिसल्या.

देशात 22 मार्च पासून लॉकडाउन लागू झाला असला तरी महाराष्ट्रातील थिएटर, मल्टीप्लेक्स 13 मार्च रोजी बंद झाले होते, जानेवारी ते 13 मार्च दरम्यान 27 मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. एप्रिल, मे, जून महिन्यात प्रदर्शित होण्यासाठी तेवढेच सिनेमे सज्ज होते,आमचा प्रविण तरडे दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा सिनेमा 95 टक्के तयार आहे. दिग्पाल लांजेकरचा ‘जंगजौहर’ पोस्ट प्रॉडक्शन मध्ये आहे. झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकरांचा‘पांघरुण’, वायकॉम18 चा ‘मी वसंतराव’ असे अनेक मोठे सिनेमे रिलीजसाठी तयार आहेत, परंतु थिएटर, मल्टिप्लेक्स कधी सुरू होणार हे माहीत नाही. तसेच लॉकडाउन मुळे रखडलेले शूटिंग, पोस्ट प्रॉडक्शनचे अपूर्ण राहिलेले काम अशा चित्रपटांची संख्याही मोठी आहे.

वर्षाकाठी शे – सव्वाशे सिनेमेमराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये प्रदर्शित होतात. वर्षागणिक हा आकडा वाढत चालला असल्यामुळे चांगले थिएटर,चांगले शो मिळावे यासाठी झगडणारी माणसं मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि निर्माते अमेय खोपकर, रमेश परदेशी यांच्यासह इतर राजकीय वजनदार व्यक्तीकडे चित्रपटाला शो मिळवून द्या अशी विनंती करायचे. आम्ही समव्यवसायीक एकत्र आलो की विविध विषयावर चर्चा करायचो, त्यामध्ये सिनेमा निर्मितीची संख्या कमी झाली पाहिजे हा मुद्दाही असायचा, मात्र आज निर्माण झालेल्या परिस्थितीमुळेसिनेमा प्रदर्शित करायला मर्यादा पडतील असा विचार कधीही कुणाच्या मनात आला नाही.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत विविध उद्योग, व्यवसायांचे भविष्य अडचणीत आहे.परिणामी इतर अनेक व्यवसायांबरोबरच थिएटर, मल्टिप्लेक्सव्यवसायावर येत्या काळात मोठा परिणाम झालेला असेल, या क्षेत्राची उलाढाल कमी होण्याचा अंदाज आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी बदल हा निसर्गाचा नियम आहे, पाण्याचा प्रवाह वाहता असेल तर तो अडवण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी तो दिशा बदलून किंवा पर्यायी मार्ग काढून वाहत असतो. मित्रांनो आपणही अशाच सर्जनशील आणि कल्पकतेने भरलेल्या प्रवाही इंडस्ट्रीचा भाग आहोत. आगामी काळात आपली फिल्म इंडस्ट्री काही बदलांसह पूर्वीसारखी नक्कीच प्रवाहीत होईल असा मला विश्वास आहे.

Life is beautiful.

  Facebook   Pinterest   Twitter   Google+
#Corona#Covid19#LifeIsBeautiful#lockdown#unlock1 #Marathifilms
  • Test Video Post
    January 02, 2019 · 0 comments
    This section can be used to write more about the video
    1914
    2
    Read more
  • Ashvini Yardi
    October 18, 2018 · 0 comments
    A career span of 24 years in the television industry and then making a clean
    2994
    4
    Read more
  • Sayalee MARATHE
    October 07, 2021 · 0 comments
    <!-- wp:paragraph --> <p>[rtbs name="sayalee-marathe"]</p> <!-- /wp:paragraph
    2219
    4
    Read more
5 Comments:
  1. Very cryptic analysis..Positive message! 👍

    Kedar Soman · June 24, 2020
  2. अतिशय समर्पक विवेचन! नावे मार्ग सुचविणाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

    Vasant Vasant Limaye · June 24, 2020
  3. खुप छान !!!

    Deepak Kadhav · June 24, 2020
  4. खूपच सुंदर लीहलय वास्तववादी परीस्थिती आपण मांडली,
    सर्वच क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात बदल घडलेत व घडतही आलेत परिस्थिती जगायला शिकवते हे खरय.. त्यात आपण कसे टिकतोय हे महत्वाचे…
    खूपच छान लेख लीहला…

    राहुल मच्छिंद्र जगताप · June 25, 2020
  5. 100% agree with ur points. Hurdles are.part of everybody’s life. Change is constant and is always towards betterment… i am not only sure but confident that art and artists are lifelines of human kind…Old days there used to be Mehfils at private places, which gave birth to Sawai and Vasantoutsav..some thing will surely come up in replacement of multiplexes…

    Prashant · June 25, 2020

Leave a Comment! Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts
  • Smita Kulkarni
  • Paula McGlynn
  • Shweta Shalini
  • sumitra bhave
  • Priyanka Sachdev
Categories
  • 9women9days Season 4
  • 9women9days Season 3
  • 9women9days Season 2
  • 9women9days Season 1
  • Game Changers
  • Music Concert
  • Vinod Satav
Recent Comments
  • Kailas deshmukh on Madhugandha Kulkarni
  • Prashant on साईड बिझनेस! उसमे क्या है?  
  • राहुल मच्छिंद्र जगताप on साईड बिझनेस! उसमे क्या है?  
  • Deepak Kadhav on साईड बिझनेस! उसमे क्या है?  
  • Vasant Vasant Limaye on साईड बिझनेस! उसमे क्या है?  
Copyright © 2020 Lead Media & Publicity. All Rights Reserved | Powered by Procommun