LogoLogo
  • Home
  • About
  • Services
  • Portfolio
  • Gallery
  • 18of18
  • Blog
  • Contact

Aparna Prabhudesai

Lead Media and Publicity · September 22, 2017 · 9women9days Season 2 · 0 comments · 3492 Views
13
aparna-prabhudesai
transparent
600
#ff6600
  • ‌
  • Aparna Prabhudesai
  • अपर्णा प्रभुदेसाई

Aparna Prabhudesai

From wheelchair to climbing Mount Everest! Aparna has the grit and will power to scale mental and physical mountains.  She scaled the Mount Everest in 2017 at the age of 47 and she is a phenomenal inspiration to many. Her father was an army officer who commanded the Mahar Regiment, which is celebrating its platinum jubilee this year. She chose the north side as it is an extension of the Siachen Glacier, where her father served. A few years ago Aparna had a fall leading to complications which left her wheelchair bound and with a prognosis of not being able to walk without support. She not only overcame that but went on to complete many half and full marathon and if that was not enough, an Ultra Marathon of 75kms as well. A corporate trainer by profession and a passionate athlete, wishing Aparna the very best always!

A lot of Leadership is a Private Journey of some hard hitting decision making. Do you agree?

  • All of us have a leader within us. Some of us can bring that leader to fore and some amongst us stay contented with becoming followers. Though every successful journey is about taking a decision at every cross road of life and then becoming the bearer of that cross.

Were there any important mentors or influencers in your life that led you to your current position?

  • I would not name people or influencers. To me life has been an influencer. I give a large credit to my Indian Army upbringing that mentored me largely and incidents that changed course of life that led me to my current position.

How do you think being a woman impacts your leadership style?

  • Being a woman gives me the ability to look at people not from the head but the heart. All emotions reside there and being in touch with these emotions, always, makes it a holistic experience for every interaction.

What will be the biggest challenge for the generation of women behind you? What advice would you give a young woman starting out in her career?

  • I feel the biggest challenge for the next generation women is to be able to balance the role that the changing society expects from Women. A professional at the workplace, a successful ‘family binder’ at home and an effective citizen. My advice to young women would be “Be honest to yourself ” first. Integrity, in everything that you do, will take you places. The 3 Ds I love to talk about:

Devotion, Dedication and Discipline are the mantra for success in all that you do.”

In times of stress, what is it that gives you solace ?

  • In times of stress 2 things help me; the first ‘my faith’ in the universe and second ‘living in the now’ everything else sorts itself out.

A Woman Anchor in your life you would dedicate this interview too? 

  • I don’t have one woman that I would dedicate this too. But many role models whom I aspire to be like or learn from- Mother Teresa for her compassion, Dr. Kiran Bedi for her courage of conviction, Nita Ambani for her poise and grace…. The list is endless.

अपर्णा प्रभुदेसाई

मनात जिद्द आणि स्वतःवर विश्वास असेल तर कोणतीच गोष्ट असाध्य नाही. याच जिद्दीच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अपर्णा प्रभुदेसाई यांनी आकाशाला गवसणी घालणारे यश संपादित केले आहे. काही वर्षांपूर्वी व्हीलचेअरवरून उठून सक्षमपणे चार पावलेदेखील चालू न शकणाऱ्या अपर्णा प्रभुदेसाई यांनी वयाच्या ४७ व्या वर्षी सर्वोच्च असे एव्हरेस्ट शिखर सर करत आजच्या तरुण पिढीसमोर स्वतःचा आदर्श निर्माण केला आहे.

‘आर्मी ऑफिसर’ या पदावरून निवृत्त झालेल्या त्यांच्या वडिलांनी या वर्षी वयाच्या ७५ व्या वर्षात पदार्पण केले. त्यांना वाढदिवसाची भेट म्हणून त्यांनी चढाईसाठी वडिलांची कर्मभूमी असलेला सियाचीनकडील मार्ग निवडत त्यांनी ही चढाई पूर्ण केली आहे.

काही वर्षांपूर्वी एका दुखापतीचे निमित्त होऊन अपर्णा ‘व्हीलचेअरस्थित’ झाल्या. त्यांना आधाराशिवाय चालताही येत नव्हते परंतु प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर संकटावर मात करत त्यांनी आजपावेतो अनेक अर्ध मॅरेथॉन, मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. एवढेच नव्हे तर ७५ कि.मी. अंतराची ‘अल्ट्रा मॅरेथॉन’ देखील त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या जिद्दी एव्हरेस्ट वीरांगनेला ‘लिड मिडीया’ कडून खूप खूप शुभेच्छा!

असं म्हणतात की एक चांगला लीडर म्हणून आयुष्यात अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतात. लीडरशीप आणि डिसिजन मेकिंग बद्दलचे तुमचे अनुभव सांगा.

  • आपल्या प्रत्येकाच्याच आतमध्ये एक ‘लीडर’ असतो. पण प्रत्येकालाच तो लीडर ओळखता येईल असे नाही. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक टप्प्यावर योग्य तो निर्णय घेऊन पुढे जावे लागते. आणि जो निर्णय घेतला आहे तो जवाबदारीने योग्य ठरवता यायला हवा.

‘व्हीलचेअर ते माउंट एव्हरेस्ट’ या प्रवासाचे श्रेय कोणाला द्याल?

  • या प्रवासाचे श्रेय कोणा एका व्यक्तीला नाही देता येणार. माझं आयुष्यच मला कायम प्रेरणा देत होतं. या यशाचे श्रेय कोणाला द्यायचे असेल तर ते मी ‘इंडियन आर्मीच्या’ ज्या कडक शिस्तीत वाढले, ज्या वातावरणात लहानाची मोठी झाले त्या इंडियन आर्मीला देईन. त्यामुळेच मी येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करू शकले.

स्त्री असल्याचा तुमच्यातील नेतृत्वशैलीवर कसा परिणाम होतो?

  • एक स्त्री म्हणून कोणतीही व्यक्ती मी आधी भावनिकदृष्ट्या समजून घेते. त्यामुळे भावनिक निर्णय जरी घेतले गेले तरी ते मनाला पटणारे असतात आणि समाधान देणारे असतात.

तुमच्या मते आजच्या तरुणींपुढे काय आव्हाने आहेत? आणि तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन देऊ इच्छिता?

  • येणाऱ्या काळात स्त्रियांकडून समाजाच्या असणाऱ्या अपेक्षा आणि स्वतःचे अस्तित्व जपणे यात समन्वय साधणे हे सगळ्यात मोठे आव्हान आहे. कामाच्या ठिकाणी ‘प्रोफेशनल’, घरी कुटुंबवत्सल आणि समाजात एक आदर्श नागरिक अशा तीन भूमिका त्यांना सांभाळाव्या लागणार आहेत. पण स्वतःवर विश्वास आणि कामावर श्रद्धा असेल तर असाध्य काहीच नाही आणि ‘सक्सेस मंत्र’ म्हणाल तर तीन D वर विश्वास ठेवा.

Devotion, Dedication, Discipline

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीचा मनावर जो ताण येतो तो घालवायला काय करता?

  • दोन गोष्टी मला कायम तणावातून मुक्त करतात. – सगळ्यात पहिले म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा आणि दुसरं म्हणजे वर्तमानकाळात जगायला शिका, मग आयुष्य आपोआप सुरळीत होतं.

ही मुलाखत तुमच्या आयुष्यातील सगळ्यात प्रेरणादायी स्त्रीला समर्पित करायची असेल तर कोणाला समर्पित कराल?

  • असं कोणा एकाच स्त्रीला मला समर्पित नाही करता येणार. माझ्या आयुष्यात मी अनेक जणींकडून प्रेरणा घेतलीये. पण मी मदर तेरेसा यांच्या सहृदयतेसाठी, किरण बेदी यांना त्यांच्यातील धाडसी वृत्तीसाठी आणि नीता अंबानी यांना त्यांच्या संयमी स्वभावासाठी ही मुलाखत समर्पित करेन.
  Facebook   Pinterest   Twitter   Google+
#9#Special99women9days
  • साईड बिझनेस! उसमे क्या है?  
    June 24, 2020 · 5 comments
    <strong>प्रसंग - 1</strong> दोन दिवसांपूर्वी एका ठिकाणी जात असताना एक
    7656
    2
    Read more
  • Malishka Mendonsa
    September 21, 2017 · 0 comments
    RJ Malishka is the most popular Radio Jockey who has been in the news in recent
    3370
    15
    Read more
  • Nivedita Saboo
    October 07, 2016 · 0 comments
    1. What is your big dream? The big vision is to create a legacy for the
    3025
    26
    Read more

Leave a Comment! Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts
  • Smita Kulkarni
  • Paula McGlynn
  • Shweta Shalini
  • sumitra bhave
  • Priyanka Sachdev
Categories
  • 9women9days Season 4
  • 9women9days Season 3
  • 9women9days Season 2
  • 9women9days Season 1
  • Game Changers
  • Music Concert
  • Vinod Satav
Recent Comments
  • Kailas deshmukh on Madhugandha Kulkarni
  • Prashant on साईड बिझनेस! उसमे क्या है?  
  • राहुल मच्छिंद्र जगताप on साईड बिझनेस! उसमे क्या है?  
  • Deepak Kadhav on साईड बिझनेस! उसमे क्या है?  
  • Vasant Vasant Limaye on साईड बिझनेस! उसमे क्या है?  
Copyright © 2020 Lead Media & Publicity. All Rights Reserved | Powered by Procommun