Smita Patil
A special profile of an amazing lady who goes by the name of SMITA PATIL is our #9women9days 6th lady.
The profile of Smita has been written for us by another multifaceted super mom Shilpa Godbole who is a marathoner and fitness enthusiast training under Smita.
Smita Patil comes across as a young woman who happens to be 60, she is a fine example of how to dare getting older.
While Smita will modestly credit her healthfulness to genes, her resume shows that she has spent a great amount of years being a fitness professional and a keen sportsman. During 2015 and 2016, she was a regular podium finisher in the age category of 55-60 years at some of India’s prestigious half marathons, like the erstwhile SCMM, ADHM, and SPBM. When she is not running or cycling Smita runs her own Pilates studio “Happilates, Doing more.." in Pune.
In Smita’s words this is a short compilation of her fitness expedition
"I have been an ardent sportsperson since I was in school. Having participated and being good at many sports related events helped me become sports captain of my school. Marriage and childbirth were the only times I probably slacked off in terms of keeping up with sports. I worked hard in instilling the values of sportsmanship in my children, both of them were chosen to represent at the state level swimming and tennis meets. During the same time I got a opportunity to start a fitness studio in Shivaji Park, Mumbai. I also was chosen to showcase my regimen in a video made by Dr Dilip Nadkarni’s (Orthopedic surgeon at Lilavati hospital, Mumbai) called ‘Knee problem to no problem’, which highlights lifestyle change as a preemptive measure for knee pain related issues.
Moving from Mumbai to Pune brought me a step closer to making a niche for myself in the field of fitness, I got to head the fitness operation department at a leading chain of health clubs in Pune. At around the same time I developed a penchant for cycling and trekking, it only added another dimension to my goals, I was happy to win the endurance/ adventure championship, Enduro, not once but 2 times in the corporate category. I also won several cycling races to Sinhagad and Lavasa, beating participants who happened to be much younger than me! In the past 4 years, I covered some scenic and enviable destinations in northern and southern India on the cycle. Manali-Leh-Khardungla in 9 days and Vellore to some fabulous hill stations around Chennai in 6 days.
At 56, I took up running as a hobby and have literally not looked back since then. An association with Pune Running got me to encourage many women to take up running on our regular Sunday runs. in 2015, I won a gold medal at the prestigious Standard Chartered Mumbai Marathon in my category by finishing the half marathon in 1.59 hours. I have been fortunate to be able to take home a podium finish in almost all the events I took part in.
The most important journey for me has always been to live by example, to inspire women to look after themselves first by being fit, by making the right choice of choosing a model of exercise and selecting the right nutrition to get to their goals. Starting my own Pilates studio called ‘Happilates ….doing more’ presented me with this fabulous opportunity to guide my students.
A memorable event for me was when at the erstwhile Standard Chartered Mumbai Marathon in 2016 where I won a silver in my category, but my crowning moment was that, 17 of my Pilates students participated in the half and full marathon and some of them even got a podium finish!
स्मिता पाटील
अवघ्या साठ वर्ष वयाची उत्साहाने सळसळणारी तरुणी म्हणजे फिटनेस फ्रीक स्मिता पाटील! स्मिता यांच्याकडे बघताना वाढत्या वयाबरोबर स्वत:ला ग्रेसफुल कसं ठेवावं याचा जणु धडाच आपल्याला मिळतो. स्मिता अतिशय नम्रपणे त्यांच्या या फिटनेसचं श्रेय त्यांचा ‘जीन्स’ना देत असल्या तरी प्रत्यक्षात त्यांनी त्यासाठी घेतलेली मेहनत ही प्रत्येकाला आश्चर्य वाटायला लावणारी आहे. २०१५-१६ च्या दरम्यान ५५-६० या वयोगटातून प्रत्येक महत्वाची मॅरेथाॅन पूर्ण करणाऱ्या नावांमध्ये स्मिता यांचं नाव आवर्जून घेतलं जायचं. धावणं आणि सायकलिंग करणं हा स्मिता यांचा ध्यास आहे. जेव्हा त्या या दोन आवडीच्या गोष्टी करत नसतात तेव्हा त्या ‘हॅप्पीलाटेस - डूईंग मोअर’ या नावाचा आपला पिलाटेस स्टुडिओ चालवतात.
स्मिताच्याच शब्दात सांगायचं तर त्यांच्या फिटनेस मोहिमेचं एक मूर्त रुप म्हणजे हा स्टुडिओ...
त्या सांगतात, शाळेत असल्यापासूनच खेळ, फिटनेस यांचं मला वेड आहे. प्रत्येक खेळाच्या स्पर्धेत कायम सहभागी होणं, चांगली कामगिरी करणं यामुळेच मी नेहमी शाळेच्या स्पोर्ट्स टीमची कॅप्टन होते. लग्न आणि मुलांचा जन्म या एवढ्याच काळात बहुदा मी खेळापासून लांब राहिले असेन, पण माझ्या मुलांमध्ये खेळांची आवड रुजवण्यासाठी मी जाणिवपूर्वक प्रयत्न केले आहेत, त्यामुळेच माझ्या दोन्ही मुलांनी पोहण्याच्या आणि टेनिसच्या स्पर्धांमध्ये राज्य स्तरावर सहभाग घेतलाय. याच सुमारास मला दादरच्या शिवाजी पार्क परिसरात फिटनेस स्टुडिओ सुरु करण्याची संधी मिळाली. डाॅ. दिलीप नाडकर्णी (लिलावती रुग्णालयाचे प्रसिद्ध अस्थिशल्यविशारद) यांनी ‘नी प्राॅब्लेम टू नो प्राॅब्लेम’ या विषयावर जीवनशैलीतील बदल गुडघ्यांच्या दुखण्याला कसे कारणीभूत ठरतात याविषयी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये मी सहभाग घेतला.
मुंबईहून पुण्याला येण्याच्या निर्णयामुळे फिटनेस या माझ्या आवडत्या क्षेत्रात मी माझ्यासाठी एक स्थान निर्माण करु शकले. एका प्रसिद्ध हेल्थ क्लब मध्ये फिटनेस विभागाची प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. त्याच दरम्यान सायकलिंग आणि ट्रेकिंगची आवड निर्माण झाली त्यामुळे माझ्या फिटनेस प्रेमाला नवीन आयाम मिळाले असंच म्हणावं लागेल. एंड्युरन्स, अॅडव्हेंचर प्रकारातल्या स्पर्धा काॅर्पोरेट विभागातून दोनदा जिंकणं या गोष्टी माझा उत्साह वाढवणाऱ्याच होत्या. माझ्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या स्पर्धकांना मागे टाकत सिंहगड, लवासाच्या सायकल स्पर्धा ही मी जिंकले आहे. गेल्या चार वर्षात उत्तर आणि दक्षिण भारतातल्या काही अप्रतिम ठिकाणांना मी सायकलवरुन भेटी दिल्या. ९ दिवसात मनाली-लेह-खार्दूंगला, ६ दिवसात वेल्लोरपासून चेन्नईजवळच्या एका हिल स्टेशनवर सायकलिंग करत पोहोचण्याचा अनुभव अमेझिंग म्हणावा असाच आहे!
वयाच्या ५६ व्या वर्षी मी आवड म्हणून धावायला सुरवात केली. त्या दिवसापासून मी कधीही मागे वळून बघितलं नाही. ‘पुणे रनिंग’ शी जोडली गेले आणि अनेक महिलांना धावण्यासाठी प्रेरणा देत गेले. २०१५ च्या स्टॅंडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथाॅनमध्ये मी माझ्या वयोगटात १ तास एकोणसाठ मिनिटात स्पर्धा पूर्ण करत सुवर्ण पदक मिळवलं.
माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक महिलांना फिट राहाण्यासाठी प्रेरणा देणं! त्यांच्या शरीराला, वयाला साजेसा व्यायाम, आहार निवडायला मदत करुन त्यांचा फिटनेस पर्यंत होणारा प्रवास बघणं मला आनंद देतं. ‘हॅप्पीलाटेज’ या माझ्या स्टुडिओमुळे अशा अनेक महिलांपर्यंत फिटनेसचा मंत्र पोहोचवण्याची संधीच मला मिळाली.
२०१६ मध्ये मी स्टॅंडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथाॅन स्पर्धेत मी सिल्व्हर मेडलची मानकरी ठरले खरी पण माझ्या पीलाटेज स्टुडिओच्या १७ विद्यार्थिनींनी ती मॅरेथाॅन पूर्ण करणं हेच माझ्यासाठी खरं मेडल ठरलं!
Smita we are really proud of u,and being front runner always.