Sayalee is a maverick in the nicest way.
She moves to a different tune. She operates at a different level of thinking.
Her vision is extraordinary. An engineer by educational training, theatre actor at heart, a jewellery designer by choice and a business woman at heart.
The owner and mother of the brand - AADYAA.
Original silver jewellery collection and collectibles.
A brand that she established in 8 short years! Single minded approach and consistency of delivering something new that clicked big time and is now an established business in the jewellery sector.
Some people can carry success with so much ease. When you speak to them, their openness can actually make you believe that you can accomplish just so like them. But hold on and pause because here is a young lady who literally slogs crazy hours for her work. For accomplishing her dreams and is setting new goals every day to achieve for her future plans for AADYA. She has built an amazing network of business friendships and collaborations. Aadya is today poised for exponential growth and is one of the fastest growing digital brand of jewellery in the country. And mind well, success at e-commerce level of high range jewellery requires ingenuity and understanding of not only the target audience but also the technical aspect of which Sayalee has a tremendous hold.
Sayaleeis is an explorer at heart.A person who is extremely comfortable with her own company and her own thoughts. She is and transparent and there is no iota of hesitation when she speaks because she believes in herself and her abilities.
Her strength is she does not shy away from experimenting. Nothing fazes her to try out new things. Sign of a true trailblazer!
Life did give her lemons when she was a young woman and she did make merry with loads of lemonade!
Sayalee, may your tribe grow bigger and better and let us be witness to every success that you achieve.
Wishing our 1st special woman of #9woman9days series the very best for the future.
What am I known for?
Innovator. Multitasker
And in that order.
New ideas fascinate me and I love going deep into the ideation with lot of research and homework from my end. It is something that comes naturally for me. But at the same time, I multitask at various levels of work and personal life. So yes, both these are what really define my way of operating.
Leadership is a Private journey of hard decisions.
Oh yes undoubtedly. Every Business-owner faces different set of challenges and tough decision making forms a part of the journey. However, my take is that not only is it only hard decisions and money making, but the entire journey with its ups and downs is most rewarding feeling. There are lot of intangible gains in this process and that is what actually gives me a high. As a leader and entrepreneur CONSISTENCY in efforts and approach has been my motto and that is what I have continued to follow for the past 8 years.
Pandemic made me unlearn ….
Truthfully so much!
Pre pandemic I genuinely was sold on the idea of retail way of doing business. During the past difficult days of pandemic and uncertainty, I am convinced of a different way of doing business through e-commerce. Interactions with staff increased ten-fold as the result of shutdowns and interpersonal communication had to be learnt in a different way.
In a way, it forced all of us to learn new ways of living life. The things that I learnt will hopefully be implemented in times to come.
My Mentor ?
My Business!
I come from no background of business or jewellery background at all. Every day is a new chapter and a new learning and this is how I am shaping and am being groomed by my business itself. My vendors, stakeholders form an important part of my business learning and therefore they too are an important part of my day to day learnings in the business
What drives me ?
Allow me to elaborate. Work is worship for me. Honestly. To throw myself into work and yeah well, workaholic suits me! When I wake up, I am eager to get to work. I am truly thankful to work in a sector that I am passionate about. The products that I make forms a little part of peoples lives and that is a fine feeling. The people who are in my work-life give me a lot of energy. Interacting with different set of people is enriching indeed.
What am I proud off ?
My commitment to myself when I started this was to build the business in a most ethical and honest way with complete transparency and this is something that I am really proud off. To delivery what I promise my customer and vendors and truly these 8 years have been based around these principles and it has given me immense pride that AADYAA today stands tall on these firm foundations.
Advise to my younger self ?
I would pause, think and say… Girl you did well!
सायली ही एका चांगल्या अर्थानं 'बेलगाम' मुलगी आहे. सायली म्हणजे सायली मराठे! 'आद्या' या अत्यंत ख्यातनाम ज्वेलरी ब्रँडची सर्वेसर्वा!
एका अनोख्या लयीत जगणारी, आयुष्याचा विलक्षण वेगळेपणाने विचार करणारी सायली शिक्षणानं इंजिनिअर आहे.
नाट्यकलाकार ही ओळख तिच्यासाठी अतिशय खास आहे. दागिने घडवण्याची, म्हणजेच ज्वेलरी डिझाइनिंगची वाट
तिनं अगदी मनापासून चोखाळलीये. त्यामुळेच एक यशस्वी उद्योजक - बिझनेस वुमन म्हणून तिनं स्वत:ला सिद्ध केलंय.
चांदीच्या पारंपरिक आणि देखण्या, कलात्मक दागिन्यांचा आणि चांदीतून घडवलेल्या मौल्यवान संग्राह्य चीजवस्तूंचा
‘आद्या’ हा ब्रँड हे सायलीचं बाळ आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. गेल्या केवळ आठ वर्षांमध्ये ‘आद्या’ हे एकच
ध्येय जगत, अतिशय सातत्यानं सायलीनं नवं काही तरी देण्याचा धडाका लावलाय. त्यातूनच कलात्मक दागिन्यांच्या क्षेत्रात ‘आद्या’ या
व्यवसायानं आपले पाय घट्ट रोवलेत.
काही लोक आपलं यश किती सहज पेलतात ना. त्यांच्या तोंडून त्यांचा प्रवास ऐकताना, त्यांचा मोकळेपणा बघुन वाटतं आपल्यालाही जमेल अगदी यांच्यासारखंच! पण थांबा - आणि थोडा विचार करा. कारण सायलीसारखं काम करणं सोपं नाही. ‘आद्या’ या तिच्या स्वप्नाला वाहुन घेताना तिनं दिवसाचे २४ तास स्वत:ला कामाला वाहुन घेतलंय. आद्याचा विस्तार करण्यासाठी रोज नव्या कल्पना
आणि नवे विचार तिला खुणावत असतात. मित्र- त्रिणी आणि सहकाऱयांचं तिचं ‘नेटवर्क’ प्रचंड आहे. आद्याचा पसारा दिवसेंदिवस वाढत चाललाय,
इतकंच नाही तर डिजिटल स्वरुपात अत्यंत वेगाने भरभराटीला आलेला देशातला प्रमुख ज्वेलरी ब्रँड म्हणूनही आद्याकडे पाहिलं जातं. कुठलाही व्यवसाय ई-मर्स स्वरुपात मोठा करायचा असेल तर दोन गोष्टी महत्त्वाच्या. एक - आपला ग्राहक कोण याची उत्तम जाण हवी आणि दुसरं म्हणजे डिजिटल व्यवसायाच्या सगळ्या तांत्रिक बाजू सांभाळणं साधायला हवं. सायलीची या दोन्ही गोष्टींवर असलेली पकड वादातीत आहे.
सतत नवनव्या गोष्टींचा शोध घेण्याचा ध्यास आहे सायलीला. स्वत:च्या विचारांशी ती नेहमी ठाम असते. ती अत्यंत पारदर्शक आहे. आपल्या क्षमतांची पुरेपूर जाणीव तिला आहे. स्वत:वरच्या विश्वासातून ती बोलते त्यामुळे बोलताना तिच्या मनात कधीही कुठल्याही शंका नसतात. नवे प्रयोग करुन बघायला
ती कधीही कचरत नाही. ते करण्यापासून अगदी काहीही तिला रोखू शकत नाही. आपापल्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणाऱ्या
प्रत्येक प्रणेत्याचं हे वैशिष्ट्यच, नाही का?
कुणी तुम्हाला लिंबू दिलं तर त्याचं लिंबू सरबत करा, असं म्हणतात ना? सायलीनं अक्षरश: ते खरं केलंय.
सायली, तुझी आणि तुझ्या व्यवसायाची भरभराट होवो आणि तुझं प्रत्येक यश साजरं करायची, त्याचे साक्षीदार व्हायची संधी आम्हाला मिळो.
#9woman9days या मालिकेतील आमच्या पहिल्या यशस्विनीला - आद्याची जन्मदात्री सायली मराठेला तिच्या भविष्य आणि
भरभराटीसाठी अनेक उत्तम शुभेच्छा!!!
मी कशासाठी ओळखली जाते?
मी कल्पक आहे. एकाच वेळी अनेक गोष्टी सारख्याच तन्मयतेने मी करु शकते. नव्या कल्पना मला झपाटून टाकतात.
मला जे करायचंय त्याच्या मुळाशी जाऊन, पुरेसं संशोधन, गृहपाठ करुन ते काम पक्कं करायचा माझा स्वभाव आहे.
ते करतानाच व्यावसायिक आणि व्यक्तिगत पातळीवर अनेक गोष्टी सुरु असतात. त्यामुळे कल्पकता आणि एकाच
वेळी अनेक आघाड्यांवर काम करणं ही माझी वैशिष्ट्य आहेत, असं म्हणायला हरकत नाही.
नेतृत्व म्हणजे कठोर निर्णयांचा व्यक्तिगत प्रवास असतो. तुला काय वाटतं?
माझंही हेच मत आहे. प्रत्येक उद्योजक, व्यावसायिकाला वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करायलाच लागतो.
त्या त्या अनुषंगाने घेतलेले कठोर निर्णय हा त्या प्रवासाचाच एक भाग असतात. अर्थात उद्योग-व्यवसाय म्हणजे फक्त आव्हानं,
कठोर निर्णय आणि पैसा मिळवणं एवढंच नाही. या प्रक्रियेतले सगळेच चढउतार माणुस म्हणुन तुम्हाला बरंच काही देऊन जातात.
उद्योग व्यवसाय सुरु करुन तो चालू ठेवणं, वाढवणं यामध्ये सातत्य खुप महत्त्वाचं आहे. माझ्या आठ वर्षांच्या प्रवासाचं तेच गमक आहे.
पँडेमिकने काही विसरायला लावलं?
पँडेमिकने अनेक गोष्टी बदलल्या. व्यावसायिक म्हणून किरकोळ - रिटेल विक्रीबाबत असलेली माझी धारणा मला पँडेमिकने बदलायला लावली.
लॉकडाऊनसारख्या कठिण काळानं मला एक नवा धडा दिलाय, तो म्हणजे इ-कॉमर्स या प्रकाराकडे एका वेगळ्या गांभिर्यानं पहाण्याची गरज आहे. या काळात आपल्या बरोबर काम करणाऱया सहकाऱयांशी असलेल्या संवादाची गरजही बदलली, वाढली. त्यामुळे त्या आघाडीवरही नव्या गोष्टी आत्मसात करायला लागल्या. एका अर्थानं आपल्या सगळ्यांनाच या काळात नवे धडे शिकायला मिळाले. मी या काळात जे शिकले ते पुढच्या
काही वर्षांत माझ्या व्यवसायात अंमलात आणायला मला नक्की आवडेल.
माझे मार्गदर्शक, सल्लागार?
खरं सांगू? माझा उद्योग. माझ्या घरी उद्योग व्यवसायाची कुठलीही पार्श्वभूमी नाही. दागिने घडवणं किंवा विकणंही आमच्या घरात कुणीही केलेलं नाही.
पाण्यात पडल्यावर पोहायला शिकतात तशी मी शिकले आहे. इथे रोजचा दिवस नवा अनुभव देतो आणि नवं काही शिकवतो. या व्यवसायानंच मला उद्योजक, व्यावसायिक म्हणून घडवलंय. त्याबरोबरच माझ्या सगळ्या सहकाऱयांचाही यात अगदी महत्त्वाचा वाटा आहे, हे मला मान्य करायलाच हवं.
चालत राहण्याची प्रेरणा कशातून मिळते?
अगदी मनापासून सांगायचं तर - काम करण्यातूनच ही प्रेरणा मिळते. काम करण्यावर माझी शब्दशः भक्ती आहे. सकाळी उठून कामाला सुरुवात
करण्याची कल्पना मला भरपूर ऊर्जा देते. मी घडवत असलेले दागिने, म्हणजेच माझं काम हा कुणाच्या तरी जगण्याचा, अस्तित्वाचा भाग होत
जातं ही कल्पना मला सुखावते. त्यातून कामाचा उत्साह दुणावतो. माझे सहकारी आणि माझ्या व्यवसायाच्या निमित्तानं भेटणारी तरतऱ्हेची मला
प्रेरणा देतात. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसांशी होणारा संवाद नेहमीच समृद्ध करणारा असतो.
मला कशाचा अभिमान वाटतो?
मी व्यवसायात उतरायचं ठरवलं तेव्हा एक मी अगदी स्वत:शी ठरवलं होतं. ते म्हणजे जे करायचं ते नैतिकता आणि प्रामाणिकपणाला धरुनच.
आज आठ वर्षात स्वत:ला दिलेला हा शब्द मी मनोमन पाळलाय. संपूर्ण पारदर्शकता ठेवून मी उभ्या केलेल्या व्यवसायाचा मला खुप अभिमान वाटतो.
माझ्या ग्राहकांना उत्तम तेच देणार या शब्दाला मी जागते. आपला खास दर्जा जपत ‘आद्या’ आज ज्या अढळ स्थानी पोहोचलंय त्याचा
मला अगदी मनापासून अभिमान आहे.
काही वर्षांपूर्वीची तू तुला भेटलीस तर तिला काय सल्ला देशिल?
सल्ला? अजिबात नाही. उलट मी थांबून, हसून तिला ‘वेल डन!’ म्हणेन.
Recent Comments